पुण्यातील कपडे व्यवसायिकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पुण्यातील धनकवडी येथील घटना

पुण्यातील कपडे व्यवसायिकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पुणे : न्यूज नेटवर्क

पुण्यातील येथील धनकवडी परिसरामध्ये एका भयंकर धक्कादायक घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून मित्राने- मित्राला पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिल आहे.

या दुर्घटनेत सुरज विजय मरळ हा २८ वर्षाचा युवक गंभीररित्या भाजून जखमी झाला आहे. हा प्रकार ( दि.७ ) च्या पहाटेच्या सुमारास धनकवडीच्या स्मशानभूमी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

सुरज विजय मरळ हा घरून रेडिमेट कपडे विकण्याचे काम करतो. ७ तारखेला मध्यरात्री सुरज आपला मित्र गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव यांच्या सोबत आयुष बियरबार या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवडी जवळील स्मशानभूमी या ठिकाणी आपसात चर्चा करत होते. त्यादरम्यान झालेल्या शुल्लक वादातून आरोपी गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव याने सुरज विजय मरळ याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिला आहे.

या घटनेत सुरज मरळ हा जवळपास तो ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेचे गांभीर्य पाहून सहकारनगर पोलिसांनी सत्येंद्र प्रमोद कुमार यादव विरुद्ध कलम ३०७,५०४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.