khed | पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटात सुरू झाला विकासाचा झंजावात

पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गट: विकासाला प्राधान्य, जनतेच्या सेवेसाठी सज्ज! ; विकासाच्या वाटेवर ठाम पाऊल

khed | पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटात सुरू झाला विकासाचा झंजावात

Development started pait - ambethan jilha parishad grup 

 

महावार्ता लाईव्ह | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक होताच खेड तालुक्यातील पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटात विकासाचा झंजावात सुरू झाला.या गटातील शिवेच्या वाकी तर्फे वाडा गावात अंतर्गत १०.५० लक्ष निधीतून रस्त्याचे कामाचा शुभारंभ या गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुनिता बुट्टे पाटील व पंचायत समितीच्या सदस्या श्रद्धा मांडेकर यांच्या हस्ते झाला.

 

जिल्हा नियोजन समितीवर शरद बुट्टे पाटील असल्याने त्यांनी १०.५० लक्ष रुपयांचा निधी वाकी तर्फे वाडा येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामासाठी दिला होता. या रस्त्याचा कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील व पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर यांचे करण्यात आला.तसेच सरपंचपदाचा पदभार निर्मला कोळेकर यांनी स्वीकारताच त्यांच्या गावात रस्त्याचे कामाचा शुभारंभ झाला हा मोठा योगायोग आहे.

 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत,समिती निवडणुकीचे वातावरण गरमागरम असताना पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात विकासकामे सुरू झाल्याने शिवे व वाकी तर्फे वाडा ग्रामस्थांनी भूमिपूजन प्रसंगी आनंद व्यक्त केला.रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी शरद बुट्टे पाटील यांचा सत्कार केला.तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुनीता बुट्टे पाटील व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य श्रद्धा मांडेकर यांचा भव्य सत्कार ग्रामस्थांनी केला.निर्मला कोळेकर यांचाही गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.

 

रस्त्याचे कामाची भूमिपूजन प्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुटे पाटील माजी, सभापती चांगदेव शिवेकर, शिवेच्या सरपंच निर्मला कोळेकर, माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, ज्ञानेश्वर शिवेकर, अक्षय शिवेकर, शांतराम शिवेकर, कविता शिवेंकर, आनंदा साकोरे यात्रा कमिटी अध्यक्ष विश्वनाथ शिवेकर, माजी चेअरमन नामदेव शिवेकर, दत्ता शिवेकर, तुकाराम शिवेकर, काळुदास सातपुते, गेनभाऊ पाचरणे, सिताराम पोमण बबन कोळेकर शिवाजी कोळेकर,शिवाजी कोळेकर, आशिष शिवेकर,योगेश शिवेकर,महादेव कोळेकर, ज्ञानेश्वर शिवेकर, अमोल कोळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सुनीता बुट्टे पाटील, श्रद्धा मांडेकर,चांगदेव शिवेकर, दत्तात्रय मांडेकर यांची भाषणे झाली. आभार शरद बुट्टे पाटील मित्र मंडळ मुंबईचे अध्यक्ष मारती कोळेकर यांनी मानले.

 

पाईट -आंबेठाण जिल्हा परिषद गटातील गावच्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल.जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या विकासकामांचा जाहीरनामा  याप्रमाणे कामे करणार असून अनेक निधी खेचून आणणार आहे.जिल्हा परिषद गट विकास प्रक्रियेने पुढे नेण्यासाठी प्रयत्न आहेत - शरद बुट्टे पाटील, माजी सभापती जि.प पुणे