माजी सरपंच प्रभाकर रौंधळ यांचे निधन

माजी सरपंच प्रभाकर रौंधळ यांचे निधन

 

राजगुरुनगर : रौंधळवाडी माजी सरपंच,रामगिरबाबा सह.दूध संस्थाचे सलग पंचवीस वर्षे संचालक,सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर तुकाराम रौंधळ यांचे हृदविकाराच्या धक्कायाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,चार भाऊ,दोन बहिणी,दोन मुले,एक मुलगी असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने गावासह त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. रौंधळवाडीचे सरपंच भरत रौंधळ यांचे चुलत चुलते होते व खेड तालुका पोलिस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष शामराव रौंधळ यांचे बंधू होत.