Breking News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

वाहनांवर दगडफेक : हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी

Breking News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला
Anil Deshmukh 

महावार्ता लाईव्ह | राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रचार सांगता सायंकाळी ६ वाजता झाली. परंतु शेवटी निवडणुकीला गालबोट लागले. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नरखेड येथील सांगता सभा आटोपून परतत असताना देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी तूफान दगडफेक केली. गाडीच्या काचा फुटल्या आणि देशमुखांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.

 

यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला. ही दगडफेक भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप जखमी अनिल देशमुख यांनी केला. भाजपा नेत्यांनी हा सहानुभूती स्टंट असल्याचे म्हटले आहे. तसेच, हा आरोप खोडून काढत, या घटनेची पोलिस चौकशी करण्याची मागणी केली आहे.