राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राक्षे यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राक्षे यांचे निधन

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील ढोरे भांबूरवाडी-जरेवाडी संयुक्त ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच,एसएन  इंग्लिश मीडियाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष,जरेवाडी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गुलाबराव राक्षे (वय ४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.

नितीन राक्षे हे आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात परिचित होते.त्यांनी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढाविली होती.तसेच मातोश्री संस्था स्थापन करून एस.एन इंग्लिश मीडियम शाळेची उभारणी केली. राजगुरूनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार समयी तालुक्यातील राजकीय व अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.