Zp election khed | आयात उमेदवारामुळे नानेकरवाडी - महाळुंगे गटातील राजकारण फिरणार
निष्ठावंताला संधी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
Zp election khed Nanekarwadi-mahunge
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद गटातून पक्षाशी एकनिष्ठ असलेले उमेदवारांना बाजूला ठेवून आयात इच्छुकांना संधी देण्याच्या हालचालीने गटातील वातावरण प्रचंड तापल्याने गटाचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निष्ठावंताला संधी मिळणार की आयात उमेदवाराला ऐनवेळी तिकीट मिळणार या चर्चेने या गटातील नागरिकांमध्ये चर्चेची गुऱ्हाळे सुरु झाली आहेत.
नाणेकरवाडी - महाळुंगे हा जिल्हा परिषदेचा गट एकूण ११ गावांचा असून त्यामध्ये एमआयडीसी क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असल्यामुळे "मुह मांगो दाम,और करो काम" यामुळे हा गट हायव्होल्टेज समजला जातो. या गटातून निवडणूकिसाठी अनेक दिग्गज आपल्या पक्षाकडून इच्छुक आहेत. यामुळे तिकीट पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणार का हाच खरा प्रश्न या गटात निर्माण झाला आहे.पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांला तिकीट मिळाले तर दुफळी होणार नाही मात्र दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्याला तिकीट दिले तर आयात उमेदवार म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते काम करणार का आणि हा खटाटोप कशासाठी हाही प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जाऊ लागला आहे.
महाळुंगे नाणेकवाडी या गटातून निवडणूक लढविण्यासाठी नाणेकरवाडी गावचे माजी उपसरपंच गणेश नाणेकर, खराबवाडी गावचे व भाजपाचे कार्यकर्ते असूनही पक्षाची भूमिका बाजूला ठेवून विद्यमान आमदार यांना २०२४ च्या विधानसभेला मदत केलेले संदीप सोमवंशी आणि शिवसेनेचे नेते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार हे सध्या विद्यमान आमदार यांच्याकडून सर्वपक्षीय उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. शिवसेना उबाठा पक्षाकडून २०२४ ला विधानसभेला इच्छुक असलेले शिवसेनेचे नेते व माजी उपसभापती अमोल पवार इच्छुक असून त्यांनी प्रचारांमध्ये मोठ्या आघाडी देखील घेतलेली आहे. तसेच गणेश नाणेकर व संदीप सोमवंशी यांनी देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखे संपूर्ण गट पिंजून काढला आहे. एकंदरीत पवार,सोमवंशी व नाणेकर यांनाच तिकीट मिळावे अशीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे.तसेच एकनिष्ठ असल्याने पक्षाकडून त्यांना तिकीट मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत.मात्र इथे निष्ठावंत सोडून तिकीट देताना काही गडबड झाली तर पक्षाला किंमत मोजावी लागेल हे तितकेच सत्य आहे.लोकप्रतिनिधी या गटात तिकीट देण्यावरून संभ्रम अवस्थेत असल्याचे समजते. राष्ट्रवादी पक्षाकडून गणेश बोत्रे इच्छुक असून त्यांनी तर गटातील गावागावात प्रचाराचे मैदान गाजविले आहे.
वरील सर्व इच्छुक उमेदवारला बाजूला सारून खराबवाडी गावातील एक उद्योजक इच्छुक आहेत. त्यांना तिकीट देण्यावरून पक्षात धुसफूस असल्याचे बोलले जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम हा नियम लावून जर आयात उमेदवाराला तिकीट बहाल केले तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी निष्ठेला तिलांजली दिली त्या नेत्याला पक्षांत प्रवेश देऊन त्यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याच्या हालचाली होतं असल्याचे दिसत आहे.पण आयात नेते कितपत सक्सेक्स ठरतात असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे गटातील बरेचसे राजकारण फिरण्याची शक्यता आहे.
आयात उमेदवार उद्या नेत्यांची आणि लोकप्रतिनिधी यांची निष्ठा जपेल यावर मात्र कार्यकर्त्यांकडूनच अनेक प्रश्न उपस्थिती केले जात आहेत. त्यातच आयात होणाऱ्या काही नेते मंडळींनी आता पर्यंत विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात काम करून आता तेच नेते त्यांच्या पदरी तिकीट द्या म्हणून लोकप्रतिनिधी यांच्याकडे उबरे जिजवीत आहेत. पण हेच नेते कुणाच्या बाजूने गेल्यावर त्या नेतृत्वाची वाताहत होतं असल्याचेही मागील काही वर्षात निदर्शनात आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी गटाचा व्यवस्थित अभ्यास करून निष्ठावंत आणि आपल्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्या इच्छुक उमेदवार यांना संधी द्यावी. नाहीतर लोकप्रतिनिधी यांचा निर्णय चुकला तर त्याचे प्रायश्चित निवडणुकीत दिसून येईल आणि या नागरिकांना पुढील पाच वर्षे याचे परिणाम भोगावे लागेल यात तिळमात्र शंका नाही.
यावर आता लोकप्रतिनिधी साहेब यांनी आयात नेत्यांना दूर करून केले पाहिजे. आयात उमेदवाराच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी यांनी आपले नातेवाईक किंवा कुटूंबातीलं व्यक्तींना कार्यक्रमाला पाठवून गटातील कार्यकर्ते व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून याची दक्षता देखील त्यांनी घेण्याची गरज आहे. भविष्यात या गटाचे राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी यांना शुक्ष्म निरीक्षण करून योग्य व निष्ठावंत उमेदवारांची पारख करून तिकीट देणे हेच योग्य ठरणार आहे.
