Khed | माझ्या सारखा गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस तालुक्याचा आमदार होऊ शकतो. हा बहुमान मला भारतरत्न डॉ बाबासाहेबांमुळेच मिळाला - आमदार दिलीप मोहिते पाटील

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिवादन केले

Khed | माझ्या सारखा गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस तालुक्याचा आमदार होऊ शकतो. हा बहुमान मला भारतरत्न डॉ बाबासाहेबांमुळेच मिळाला - आमदार दिलीप मोहिते पाटील

राजगुरुनगर | "माझ्या सारखा गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस तालुक्याचा आमदार होऊ शकतो. हा बहुमान मला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला आहे.असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले.

महामानव,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने राजगुरुनगर येथील एसटी बसस्थानका समोरील बाबासाहेबांच्या पुतळ्यास आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मोहिते बोलत होते. 

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस,पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी विजय शिंदे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, नायब तहसीलदार राम बीजे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन काबुगडे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष अनिल कहाणे, भीमशक्ती संघटना खेड तालुका अध्यक्ष अनिल जाधव, किशोर डोळस, बौद्ध महासभा खेड तालुका अध्यक्ष पी के पवार, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक, कैलास केदारी, विद्याधर साळवे, संतोष डोळस, विजय घेगडमल, आत्माराम रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुभाष होले, वैभव नाईकरे, डॉ यश गायकवाड, भीमज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन अंकुश, रंजना रोकडे, हरेश देखणे, सिद्धार्थ कांबळे, शाम डोंगरे, पपू बनसोडे, विठ्ठल डोंगरे, रवींद्र अंकुश, प्रा.संदेश भोसले आदी मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.   

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, या देशात पूर्वी हुकूमशाही, राजेशाही होती. ती मोडीत काढून या देशात लोकशाही आणण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे देशातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले, स्वायतत्ता दिली. घटनेमुळे उच्च पदे मिळाली, गरिबातील गरीब माणूस सुद्धा राजशाहीचा मुकुट घालू शकतो महिलांना राष्ट्रपती पदावर जाता आले. जात धर्म न पाहता प्रत्येकाला अधिकार प्रदान करण्याचे काम त्यांनी केले. सर्व सामान्य माणसाला जगण्याच्या अधिकार दिले.माझ्या सारखा गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस तालुक्याचा आमदार होऊ शकतो. हा बहुमान मला भारतरत्न डॉ बाबासाहेबांमुळेच मिळाला आहे. लोकशाहीने दिलेले हक्क ही पुण्याई मानणारा मी आमदार आहे. तालुक्यात गाव तिथे समाजमंदिर आणि सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील.
 

भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्य्क्ष विजय डोळस म्हणाले, आपल्या गावात, प्रत्यके घरात, कुटुंबात बाबासाहेबांची विचारधारा पोहचली पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार निर्माण करणारे युवक युवती तयार झाले पाहिजेत "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" ही  विचार धारा पुढे नेणारा  "संघर्ष योद्धा" तयार झाला पाहिजेत.  
 

यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष शांताराम घुमटकर,डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कैलास केदारी यांनी केले आभार पी के पवार यांनी मानले.