मुंबईत राहणारे खेडचे नागरिकांना दिवाळीनिमित्त मिठाई व शुभेच्छापत्रांचे वाटप : उद्योजक मारतीशेठ कोळेकर

मुंबई : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते व भामा खोरे विकासाचे शिल्पकार शरद बुट्टे पाटील यांनी मुंबईत राहणारे खेड तालुक्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त मिठाई फराळ आणि दिवाळी ग्रेटिंग कार्डचे (शुभेच्छापत्र) वाटप केल्याची माहिती शरदभाऊ बुट्टेपाटील मित्र मंडळ मुंबईचे अध्यक्ष व उद्योजक मारुतीशेठ कोळेकर यांनी मुंबई येथे दिली.
शिवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निर्मला कोळेकर व देवतोरणे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किसन आवारी आणि अनेकांच्या हस्ते सातबंगला,गणेशनगर वर्सोवा,आनंदनगर,जोसेफ पटेलवाडी,चारबंगला, आंबोली आदी ठिकाणी राहणाऱ्या खेड तालुक्यातील नागरिकांना दिवाळी भेट म्हणून मिठाई व शुभेच्छापत्र वाटप केले.तसेच शरद बुट्टे पाटील यांनीही अनेकांना शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------------------------------------------