Khed Shivjayanti | शिवे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव; गुणवंतांचा दिमाखदार गौरव
शिवे गावात शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानचा भव्य कार्यक्रम; मिरवणूक, सन्मान आणि नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा
महावार्ता लाईव्ह | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवे गावात शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहपूर्ण आणि भव्य सोहळा पार पडला. संपूर्ण गाव भगव्या पताकांनी सजले होते आणि शिवगर्जनांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली, ज्यात ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर शिवरायांची प्रतिमा मिरवली गेली. त्यानंतर पारंपरिक शिवपाळणा सोहळा सादर करण्यात आला. पुण्यातील रणरागिणी मर्दानी युद्ध कला प्रशिक्षण संस्थाच्या खेळाडूंनी विविध युद्धकला प्रत्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे २० मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिवे गावातील प्रथम वर्ग-१ अधिकारी म्हणून निवड झालेल्या जयश्री शिवेकर (सहाय्यक संचालक, वित्त व लेखा सेवा – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC 2024) आणि राजेश नलावडे (सहाय्यक राज्य कर आयुक्त, वर्ग-१ राजपत्रित अधिकारी) यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या यशामुळे गावाचा मान उंचावल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. तर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शिवे गावच्या सरपंचपदी निवड झालेल्या निर्मला कोळेकर आणि आंबेठाण पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर यांचा ही सन्मान करण्यात आला.
तसेच बाजीराव कारके, सूरज शिवेकर, रोहिदास महाराज शिवेकर, तात्याभाऊ शिवेकर, सूर्यप्रकाश गुप्ता, सुरज शिवेकर, अंकुश संभाजी शिवेकर, भगवान मारुती शिवेकर, संदेश कुंभार, साक्षिल शिवेकर, प्रशांत शिवेकर, ज्ञानेश्वर शिवेकर, सीमा रामदास सातपुते, आर्या नितीन शिवेकर, विकास दिलीप शिवेकर, विराज काळूराम गडदे यांचा उद्योग व्यवसायातील उत्तम कामगिरी निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, माजी सभापती चांगदेव आण्णा शिवेकर भाषण झाले.
मावळते प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती शिवेकर, योगेश शिवेकर यांच्या कार्याचा सन्मान झाला. शिवछत्रपती युवा मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली अध्यक्षपदी नवनाथ शिवेकर तर उपाध्यक्षपदी सुशांत सोनवणे यांची निवड करण्यात आली.
शिवे गावचे माजी सरपंच अक्षय शिवेकर,चेअरमन शिवाजी शिवेकर,माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, विशाल नवले,अमोल शिवेकर,प्रशांत शिवेकर, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके,स्वप्नील सातपुते,नवनाथ गडदे,अजित शिवेकर अध्यक्ष मयुर मोरे, सर्व तरुण-युवा सहकारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी कार्यक्रमासाठी चेअरमन किसन गडदे, तुकाराम शिवेकर, मारुती कोळेकर, आत्माराम शिवेकर, नवनाथ शिवेकर, व्हा.चेअरमन रमेश सोनवणे, शोभा शिवेकर, संतोष सोनवणे, लक्ष्मण शिवेकर, बबन सातपुते, लहू सातपुते, दशरथ शिवेकर,सखाराम शेळके, सुभाष शेळके, अनिल घोंगे, संभाजी चव्हाण, यशवंत शिवेकर, तुकाराम साकोरे, शंकर साकोरे, जनार्दन शिवेकर, राजू गुलाब शिवेकर, संतोष सातपुते, मधुकर सातपुते, जिजाभाऊ शिवेकर, पोपट साळुंके, ज्ञानदेव शिवेकर, रामदास साकोरे, नवनाथ साकोरे, शांताराम मोरे, संतोष संभाजी शिवेकर, हिरामण शिवेकर ,पोपट शिवेकर, विष्णू गडदे, शांताराम बारकू शिवेकर, जयराम खेंगले, रहिमान शेख, माजी सरपंच पोपट दिवटे, सुनील साळुंके, बाबाजी शिवेकर, राजू सोनवणे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चिंतामण शिवेकर यांनी केले, तर व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान खेंगले यांनी आभार मानले.
