Khed Taluka | सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
आरक्षणाने अनेकांचे आकडे चुकले असून राजकीय गणिते बिघडली

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यात सरपंचपदाचे पुन्हा एकदा फेर आरक्षण काढण्यात आले. यामध्ये अनेक गावचे आरक्षण बदलल्यामुळे इच्छुकांची विकेट पडली आहे. या आरक्षणाने अनेकांचे आकडे चुकले असून राजकीय गणिते बिघडली आहेत. काही जणांना लॉटरी लागल्याने तालुक्यात कही खुशी कही गमचे चित्र आहे.
खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात काढण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नायब तहसीलदार राम बीजे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आरक्षण सोडतीसाठी विविध गावचे ग्रामस्थ आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
१८ ग्रामपंचायतींची यापूर्वी काढली सोडत
जिल्हाधिकारी कार्यालयात खराबवाडी, जऊळके खुर्द, कोहिडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनंद, धामणे, गुळाणी, रॉधळवाडी, आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाशेरे, सायगाव, कडाचीवाडी, बोरदरा, पाइंट, कोये, खालूंब्रे, टेकवडी या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. हे आरक्षण कायम ठेवण्यात आले.
पुढील प्रमाणे आरक्षण -