Khed election | ' हायव्होल्टेज काळूस ' गणातुन निवडणुक लढविण्यासाठी अनेक इच्छुक मातब्बर येणार रिंगणात ; इच्छुकांकडून प्रचारात रंगत वाढली

राष्ट्रवादी AP, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदेगट पक्षाकडून काळुस गणात जोरदार शक्तीप्रदर्शन ; इच्छुक लागले कामाला

Khed election | ' हायव्होल्टेज काळूस ' गणातुन निवडणुक लढविण्यासाठी अनेक इच्छुक मातब्बर येणार रिंगणात ; इच्छुकांकडून प्रचारात रंगत वाढली

 

महावार्ता लाईव्ह | काळूस गणात अनेक इच्छुक 
काळुस पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक उमेदवार दंड थोपटून रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सामाजिक कार्यकर्ते व केजीएन उद्योग समूहाचे प्रमुख,खेड तालुक्यातील प्रतीथयश उद्योजक असलेले शिवभक्त सय्यद इनामदार, मनसेचे जिल्हा पदाधिकारी नेते मंगेश सावंत, शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते दत्तात्रेय उर्फ भाऊसाहेब जरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाकडून तर शिवसेना शिंदेगट पक्षाकडून अँड नवनाथ कड हे इच्छुक असून यांच्यातच खरा  निवडणुकीचा सामना रंगण्याची सध्यातरी चिन्हे वर्तवली जात आहेत.

 

काळुस पंचायत समिती हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) राखीव आहे.या गणातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. प्रत्येकानी आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी फीडिंग लावली आहे. शिवसेना (उबाठा) या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून रस्सीखेच होणार आहे.राष्ट्रवादीकडून सय्यद इनामदार यांची उमेदवारी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अगोदरच फिक्स केल्याने इनामदार गाडीला ब्रेक नसल्यासारखे सुसाट सुटले असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच मनसेचे नेते मंगेश सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रचंड इच्छुक असून त्यांना देखील तिकिटाचा ग्रीन सिग्नल मिळाल्याने प्रचाराच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. तसेच याच पक्षाकडून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असलेले वाकी बुद्रुक विकास सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रेय उर्फ भाऊसाहेब जरे यांनीही तिकिटाची मागणी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे लावून धरली आहे. यामुळे तिकीट नक्की कोणाला हाही प्रश्न निर्माण झाला आहे.तिकीट न मिळाल्यास जरे वेगळी वाट धरण्याचा त्यांचा पवित्रा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अँड नवनाथ कड यांनी उमेदवारी मागितली असून त्यांचा प्रचार देखील सुरू असून त्यांच्या स्पर्धेत तिकिट मागणीसाठी अन्य कोणी नसल्याने त्यांना तिकीट मिळण्याची खात्री स्पष्ट आहे. एकंदरीत काळुस ह्या हायव्होल्टेज गणातून अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात येण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.


नव्याने गट व गणांची रचना झाल्यानंतर काळूस गणात अनेक गावांचा बदल झालेला आहे.यामुळे कोणाला कोणती गावे फायदेशीर आहेत किंवा कोणाला अडचणीची जाणार आहेत याचे देखील आडाखे इच्छुक उमेदवारांकडून बांधले जात आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्याला गणातील गावातून अधिक मते कशी मिळतील यासाठी आतापासूनच फील्डिंग लावीत अनेक क्लुप्त्या लढविल्या जात आहेत.गावातील जुन्या जाणत्या व त्यांच्या शब्दाला किंमत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक इच्छुकांनी कंबर कसली आहे.


काळुस मेदनकरवाडी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले गणेश आरगडे यांच्या समवेत मंगेश सावंत यांनी देखील गणातील मतदारांना अक्कलकोट,तुळजापूर देवदर्शन यात्रा घडवून आणली आहे.तसेच जरे व कड यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी गाठी घेऊन प्रचारात रंगत आणून रान तापवायला सुरवात केली. कड,जरे,सावंत व इनामदार यांचा आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर आहे.वरील उमेदवारांचा एकंदरीत विचार करता सय्यद इनामदार यांनी कोल्हापूर, आदमापूर व ज्योतिबा या ठिकाणी गणातील महिला वर्गासह अन्य नागरिक व मतदारांना देवदर्शन यात्रा घडून आणली. तसेच गणातील प्रत्येक गावच्या घरटी ज्ञानेश्वरी ग्रंथ व या वर्षाचे कॅलेंडर वाटप करून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आता त्यांचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून सुरू आहे. यामुळे इनामदार यांचे सध्यातरी निवडणुकीतील पारडे जड वाटत आहे.