मंचर येथे हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन ; आजपासून सुरवात

मंचर येथे हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन ; आजपासून सुरवात

मंचर : मंचर येथे हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन शनिवार (३० एप्रिल) ते सोमवार (२ मे) दरम्यान केल्याची माहिती उद्योजक सतीश बेंडे पाटील यांनी दिली. मुंबई येथील सुप्रसिद्ध मल्हाराव बाबुराव आणि कंपनी, युवो फुड्‌स प्रा. लि. व अभिनव आंबा खरेदी-विक्री केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

रत्नागिरी, देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंबा उपलब्ध होणार असून चांगल्या प्रतीचे आंबे ,पूर्ण पिकलेला कार्बाईडमुक्त अस्सल चवीचा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी आणि मागणीनुसार घरपोच आंबा माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करून त्यांना योग्य बाजारभाव दिला जाणार आहेत. आंबा महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडेपाटील म्हणाले, शहरी भागात आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

परंतु मंचरसारख्या शहरातील शिवगिरी मंगल कार्यालयात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबा महोत्सवाचा फायदा खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, संगमनेर, अकोले, पारनेर, सिन्नर, नाशिक येथील ग्राहकांना होण्यासाठी चांगल्या प्रतीचा आंबा, ग्राहकांच्या आवाक्‍यातील बाजारभाव यामुळे आंबा महोत्सवाला ग्राहकांनी भेट द्यावी आणि मनसोक्त आंबा खरेदी करावा.

---------------------------------★★★--------------------------------