स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने नेहरू युवा केंद्राचे चाकण बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियान
राजगुरूनगर - प्रतिनिधी
देशभरात सर्वत्र ठिकाणी क्रीडा मंत्रालय अंतर्गत १ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये विविध संस्था मंडळ, ग्रामपंचायत,सरकारी कार्यालय यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान क्रीडा मंत्रालय तर्फे करण्यात येत आहे.
आज नेहरू युवा केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण यांच्यातर्फे मार्केट आवारात प्लास्टिक कचरा उचलून साफसफाई करण्यात आली. जमा केलेले प्लास्टिक कचरा ट्रॅक्टर मध्ये टाकून विल्हेवाट लावण्यात आली.बजरंग बोरकर यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी नेहरू युवा केंद्रचे प्रतिनिधी बजरंग बोरकर ,अशितोष येवले,बाजार समितीचे कर्मचारी सुनील गोपाळे, शिवाजी पवळे,निर्मला शिंगाडे,रमेश राक्षे उपस्थित होते.
