खेड पंचायत समितीचे माजी सदस्य हभप बबनराव अरगडे यांचे निधन

राजगुरूनगर | खेड तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सदस्य,खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व हभप बबनराव महादू अरगडे (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
बबनराव अरगडे हे खेड तालुक्यातील काळुस गावचे असून त्यांनी गावात ओम काळेश्वर प्रासादिक दिंडी,ओम काळेश्वर पतसंस्था,पवळेवाडी विकास सोसायटी या संस्थेच्या स्थापना केल्या.काळुस ग्रामपंचायतीचे सदस्य अशा अनेक पदावर त्यांनी काम केले.त्यांच्या निधनाने काळुस पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार समयी राजकीय व अनेक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.याप्रसंगी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,दोन बहिणी,दोन मुले,एक मुलगी,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते केशव अरगडे हे त्यांचे पुत्र तर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे ह्या त्यांच्या सुनबाई होत.