Khed Crime | राजगुरूनगर येथील महाविद्यालयीन तरुणीचा खून ; धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरले
कॉलेजच्या क्लासला चालले " असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, ती घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात पीडित तरुणीचा मृतदेह आढळून आला.

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्मरायची ) येथील महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात आढळून आला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अल्पवीन तरुणीचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. खून करणारा आरोपी नवनाथ कैलास मांजरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेचा सविस्तर वृत्तांत प्राप्त माहितीनुसार.....
अल्पवीन पीडित तरुणी ही नेहमीप्रमाणे "कॉलेजच्या क्लासला चालले " असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, ती घरी परतली नाही. काळजीत पडलेल्या नातेवाइकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. राजगुरूनगर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली असता, दुसऱ्या दिवशी मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात पीडित तरुणीचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, तिची बॅग जवळच्याच एका विहिरीत सापडली. पोलिसांनी प्राथमिक तपासात या प्रकरणाला खुनाचा अंदाज व्यक्त केला आहे. पीडित तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीती पसरली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302 (खुन) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपासाला गती दिली आहे.
काय घडले ?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही महाविद्यालयातील क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी राजगुरुनगरच्या पाबळरोड येथे उभी होती. यावेळी आरोपी नवनाथ याने तिला आपल्या दुचाकीवरून घरी सोडण्याची ऑफर दिल्याने आपेक्षा त्याच्यासोबत दुचाकीवर बसून गेली. त्यानंतर तीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीपात्रात मिळून आला.
पोलिसांचा तपास आणि संशयित ताब्यात
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी नवनाथ याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता खुनाची कबुली त्याने दिली. मात्र पोलिसांना या तपासात काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणेच्या ससून हॉस्पिटल येथे पाठवला असून,त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक गूढ उकलण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
परिसरात तणाव, नागरिकांमध्ये संताप
पीडित तरुणी खुनाच्या या घटनेने मांजरेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.स्थानिक नागरिकांनी या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून पीडित तरुणी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य
ही घटना मांजरेवाडी गावच्या शांत परिसरात घडल्याने खून झालेली युवती ही शिक्षण घेणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याने या प्रकरणाने समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कसा पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात काय उघड होणार? पोलिसांचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. संशयित तरुणाची चौकशी, शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.