क्रांतीदिनी राजगुरूनगर येथे पंचकलशाचे पूजन व क्रांतिवीरांना अभिवादन
भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद या घोषणांनी राजगुरूनगर शहरात वातावरण देशभक्तीमय
राजगुरूनगर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करताना ९ ऑगस्ट क्रांतीदिन ते ३० ऑगस्टपर्यंत केंद्र सरकारचे माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून भाजपचे कार्यकर्ते हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करत आहेत. क्रांतीदिनानिमित्त आज उपक्रमांना सुरुवात झाली असून "मेरी मिट्टी मेरा देश"या कार्यक्रमांतर्गत उत्तर पुणे जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या विरभूमितून आणलेले पवित्र मातीचे कलश हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ वाड्यात कलशाचे पूजन करून क्रांतिदिन राजगुरूनगर येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी,(जुन्नर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ वढू बुद्रुक,(शिरूर),हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ राजगुरुनगर,(खेड) हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक तळेगाव ढमढेरे (शिरूर) आणि हुतात्मा बाबू गेणु यांचे स्मारक म्हाळुंगे पडवळ (आंबेगाव) या वीरभूमीतून आणलेल्या पंच कलशाचे राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या जन्म वाड्यात पूजन केले.त्यानंतर पुणे नाशिक महामार्गावरील हुतात्मा भगतसिंग राजगुरू,सुखदेव यांचे स्मृतीशिल्पस्थळी असलेल्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील,सैन्य दलाचे सेवानिवृत्त मेजर दत्तात्रय टोपे,मेजर दत्तात्रय टेमगिरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,(खेड),आबा सोनवणे (शिरूर) ताराचंद कराळे (आंबेगाव),माजी जिप सदस्य अतुल देशमुख, संदीप सातव,राम गावडे,भगवान घोलप, संजय थोरात, क्रांती सोमवंशी, भगवान शेळके,संदीप बाणखेले,संजय रौंधळ, प्रिया पवार,संजय घुंडरे ,अमृत शेवकरी,गणेश सांडभोर,पांडुरंग ठाकूर, काळूराम पिंजण,सुनील देवकर,शिवाकाली खेंगले,अनघा पाठक, पूजा सणस,दत्तात्रय मांडेकर,माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, नगरसेवक निलेश घुमटकर मंगेश गुंडाळ,किशोर ओसवाल,रोहित्र डावरे,दीप्ती कुलकर्णी,रेखा क्षत्रिय,बाळासाहेब कहाणे,राहुल गवारी,मनोज मांजरे आदीसह जिल्ह्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

भारत माता की जय,वंदे मातरम,इन्कलाब जिंदाबाद या घोषणांनी यावेळी वातावरण देशभक्तीमय तयार झाले होते. हुतात्मा राजगुरूंच्या शासकीय स्मारकामध्ये, कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी ताराचंद कराळे यांनी प्रास्ताविक केले. माजी सैनिक दत्तात्रय टोपे,जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका सांगितली.मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाच्या जिल्ह्याच्या संयोजिका पुनम चौधरी यांनी सर्वांच्या आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समारोप झाला.
" देश स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे देशातील थोर क्रांतिवीरांची देशभक्ती तरुणांमध्ये जागृत झाली पाहीजे. त्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून ३० ऑगस्ट पर्यंत कार्यक्रम होणार असून उत्तर पुणे जिल्ह्यातील क्रांतिवीरांच्या वीरभूमितील पवित्र मातीचे कलशातून दिल्लीला जाणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
