शरद जोशी यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने विविध मान्यवरांकडून अभिवादन
महावार्ता लाईव्ह :
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ उभारून राज्यासह देशातील शेतकऱ्यांना एकत्र करून सरकार विरोधात जणसामान्यांचा लढा उभारणाऱ्या योद्धा शेतकरी स्व.शरद जोशी यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आंबेठाण येथील त्यांच्या अंगार मळ्यात विविध मान्यवरांनी अभिवादन केले.
शरद जोशी यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आंबेठाण येथील अंगार मळ्यात जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यासह नांदेड येथील नामदेव शिंदे, बिलोली वीरभद्र सुकाळे, तुकाराम शिंदे, बालकिसन चिलपिंपरे,सदाशिव पवार तर नाशिक येथील नजमुद्दीन शेख,सोपान संदान,निवृत्ती संदान,निवृत्ती कडलक आणि परभणीचे रामचंद्र मुळे यांच्यासह अभिमन्यू शेलार, बाबाजी पडवळ,आदिनाथ आवटी,सुजित टाव्हरे आदींनी स्व.जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
----------------------------------------------------------------
