भोसेकरांनी आण्णाना मंत्रीपद मिळतेय म्हणून मोठया मताधिक्याने विजयी करा..! शरद बुट्टेपाटील यांची भावनिक साद
महायुतीची ताकद दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठीशी | मंत्री पदाची संधी मिळणारं असल्याने तालुक्यातील वातावरण बदलले निवडणूक होणार एकतर्फी - शरद बुट्टे पाटील
चाकण | दिलीप मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला पुर्व भाग मजबूत असुन पश्चिम भाग देखिल त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या रूपाने खेड तालुक्याला मंत्री पदाची संधी मिळणारं असल्याने तालुक्यातील वातावरण बदलले असुन निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी केले.
भोसे (ता: खेड) येथे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणुक प्रचार सभेच्या निमत्ताने गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप मोहिते पाटील यांचे मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी गुजरात राज्याचे माजी गृह राज्यमंत्री विजय जडेजा,निवडणुक प्रभारी महेश मोदी, भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील राम गावडे, कैलास सांडभोर, शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे, धनंजय पठारे, शांताराम चव्हाण, गणेश सांडभोर, संजय रौंधळ,हनुमंत कड, रणजित गाडे, गणेश बोत्रे, विशाल पोतले,सरपंच विजय काळे, चेअरमन बबन गांडेकर, तानाजी कुटे, बाप्पू कुटे, दिगंबर लोणारी, भरत गांडेकर, आण्णासाहेब लोणारी, मीनाक्षी लोणारी, माऊली मुंगसे, वसंत लोणारी, संजय चव्हाण, कृष्णा लोणारी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भोसे येथे प्रचार सभेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील बोलतांना म्हणाले पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ या तालुक्याला अनेक वेळा मंत्री पदाची संधी मिळाली आहे. पण खेड तालुक्याला मंत्री पदाची संधी मिळाली नाही. स्वर्गीय नारायण पवार हे देखिल ४ वेळा आमदार होते त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तालुक्यात दिलीप मोहिते पाटील यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी जाहीर सभेत बोलताना सांगीतले की दिलीप मोहिते पाटील यांना तूम्ही निवडूण द्या मी त्यांना मंत्री करतो. मोहिते पाटील यांचा प्रशासकीय अनुभव चांगला आहे. त्यांच्या रूपाने चालून आलेल्या मंत्रिपदाच्या संधीचे सोन तालुक्यातील जनतेनं करावे अशी भावनिक साद तालुक्यातील जनतेला त्यांनी घातली.
महायुतीची ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीमागे भक्कम पणाने उभी आहे. भोसेकर नागरिक यापूर्वी देखिल आण्णांच्या पाठीमागे उभी राहिली आहे आत्ता देखिल त्यांच्या मागे उभे राहून भक्कम पणाने साथ देत त्यांना मोठया मताधिक्याने विजयी करा असे आवाहन भोसेकरांना बुट्टेपाटील यांनी केले.
