Chakan Crime | खालुंब्रेत पोलिसांची मोठी कारवाई; टेम्पोसह ९ लाख ८१ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई. प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त.

Chakan Crime | खालुंब्रेत पोलिसांची मोठी कारवाई; टेम्पोसह ९ लाख ८१ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

 

महावार्ता लाईव्ह | शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. खालुंब्रे गावाच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मालवाहू टेम्पोसह एकूण ९ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

निशांत रमाकांत उपाध्याय (वय २३, रा. खालुंब्रे, एचपी पेट्रोल पंपाजवळ, ता. खेड; मूळगाव - सिंगटोली, ता. माधोगड, जि. जालोन, उत्तर प्रदेश) आणि दयाशंकर दुबे ऊर्फ दयाशंकर द्विवेदी (वय ३९, रा. देहूगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रोहित संजय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालुंब्रे गावातील एचपी पेट्रोल पंपाच्या बाजूच्या गल्लीमध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपी निशांत उपाध्याय हा दुसरा आरोपी दयाशंकर दुबे याच्या सांगण्यावरून आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीच्या 'सुपर कॅरी' मालवाहू टेम्पोमध्ये (क्र. MH 14 LL 8097) प्रतिबंधित गुटखा व पानमसाला बाळगून असल्याचे आढळून आले.

 

तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याच्या सेवनाने मुखाचा कर्करोग तसेच इतर आजार होऊन शारीरिक हानी होऊ शकते हे माहीत असतानाही, आणि शासनाने याच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा माल अवैधरित्या खरेदी करून बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या कारवाईत टेम्पोसह एकूण ९ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जावळे करत आहेत.