मधुबन केटर्सचे आधारवड काळाच्या पडद्याआड; मधुकर सोरटे यांचे निधन

वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सोरटे व मंगेश सोरटे यांचे वडील काळाच्या पडद्याआड

मधुबन केटर्सचे आधारवड काळाच्या पडद्याआड; मधुकर सोरटे यांचे निधन

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील चाकण शहरातील मधूबन केटर्सचे मालक मधुकर दामोदर सोरटे (वय ७६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. चाकण शहरातील सोरटे परिवार समाजाच्या विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांच्या निधनाने सोरटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम अंत्यसंस्कार समयी अनेक क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती हजर होत्या. याप्रसंगी अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. चाकण शहरात मधुबन केटर्सचे सर्वेसर्वा म्हणून दिवंगत मधुकर सोरटे यांची विशेष ओळख होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सोरटे आणि चाकण शहरातील छत्रपतीनगर मंडळाचे अध्यक्ष मंगेश सोरटे यांचे ते वडील होत.