प्राचार्य सुनीता बुट्टे पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

शिक्षण क्षेत्रातील पदवी मिळाल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्णक संस्काराचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार - प्राचार्य बुट्टे पाटील

प्राचार्य सुनीता बुट्टे पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

Principal Sunita buteepatil doctorate degree 

महावार्ता लाईव्ह | ग्लोबल हुमन स्पेस युनिव्हर्सिटी,अमेरिका यांच्या द्वारा चेन्नईतील व्हर्चुअल इन्स्टिट्यूट यांच्याकडून वराळे (ता.खेड) येथील लर्निंग ट्री इंग्लिश मेडीयम शाळेच्या प्राचार्या सुनिता शरद बुट्टे पाटील यांना शिक्षणशास्त्र क्षेत्रातील ऑनरेबल डॉक्टरेट पदवी - डिलीट पदवी प्रदान करण्यात आली.

 

खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान संचलित लर्निंग ट्री इंग्लिश मेडीयम शाळा पहिली ते बारावी पर्यंत असून या शाळेच्या प्राचार्या सुनीता बुट्टे पाटील यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व बौद्धिक पातळी वाढविणारे शिक्षण तसेच आरोग्य, संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीच्या आधारे सन २००९ सालापासून केलेल्या अध्यापनाच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी - डिलीट पदवी प्रदान करण्यात आली.

 

चेन्नई येथील राजा अण्णामलाई मंदराम येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्या बुट्टे पाटील यांना डॉक्टरेट व डिलीट पदवी व्हर्चुअल इन्स्टिट्यूटचे चेअरमन बसवराजू व्ही शिवगंगा, कर्नाटक विधानसभेचे सदस्य डॉ.के.राजाराम,निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक सायबर गुन्हेशाखा (चेन्नई),भारत शिक्षारत्न प्रा.डॉ.एम. रजिनी,भारतातील लंडन देशाचे राजदूत एच.ई., युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय अंतर्गत आंतरराष्ट्रीय आयुक्त डॉ.के.वालारमठी, दिल्ली येथील इंडियन इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त डॉ.एन.रामचंद्रन या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टरेट व डिलीट पदवी प्रदान करण्यात आली.

 

सुनीता बुट्टे पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल लर्निंग ट्री शाळेचे शिक्षक, वराळे गावचे ग्रामस्थांसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.
 

शिक्षण क्षेत्रातील यशस्वी कामाबद्दल मला डॉक्टरेट पदवी मिळाल्याने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. सतत गुणवत्तापूर्वक संस्काराचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यापुढे अधिक गतिमान काम करण्यासाठी डॉक्टरेट पदवीने आनंद झाला - सुनीता बुट्टे पाटील - प्राचार्या लर्निंग ट्री स्कूल