वारकरी असल्याचे ढोंग करणारे संत ज्ञानेश्वर महाराज व वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची सभा घेतातच कसे...! - शरद बुट्टे पाटील

दुटप्पी भूमिका घेऊन राजकारणात कधी यश येतं नसत. | विरोधी उमेदवाराला संस्थांची रचना याचे ज्ञान नाही. - शरद बुट्टेपाटील

वारकरी असल्याचे ढोंग करणारे संत ज्ञानेश्वर महाराज व वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची सभा घेतातच कसे...! - शरद बुट्टे पाटील

 

राजगुरूनगर | खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार वारकरी असल्याचे ढोंग करुण दुट्टपी भुमिका घेत आहे. एका बाजूला सांगायचे मी वारकरी आहे आणि दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज व इतर संत तसेच वारकरी सांप्रदाय, वारकरी यांच्यावर टीका करुण त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची सभा यांनी घेतलीच कशी..? पक्षाच्या नेत्यांना सांगून सभा रद्द का केली नाही.दुटप्पी भूमिका घेऊन राजकारणात कधी यश येतं नसत.अशी खरमरीत टीका पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यावर करून त्यांचा वारकरी असल्याचा बुरखा फाडला.


मरकळ (ता.खेड) येथे खेड आळंदी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बुट्टेपाटील बोलत होते.यावेळी राम गावडे,कैलास सांडभोर,शांताराम भोसले, राजाराम लोखंडे,दिलीप नाईकनवरे,शांताराम सोनवणे, बाळासाहेब कोळेकर,नवनाथ होले,जयसिंग भोगाडे,शरद मुर्हे, कल्पना गवारी,तुकाराम वहिले,प्रकाश वाडेकर,धनंजय पठारे, विशाल पोतले,बापूसाहेब थिटे,विमल ठाकूर,कमल कड,संग्राम सांडभोर,निलेश थिगळे,विकास भिवरे,आनंद गवारे आदी मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


शरद बुट्टेपाटील बोलताना म्हणाले की विरोधक आण्णावर टीका करताना म्हणतात की त्यांची शेवटची निवडणुक होती.मग ते पुन्हा निडणुकीला उभे राहतात कसे..? आण्णांनी निवडणुक लढवायची की नाही हा तुम्हाला अधिकार दिला कोणी आणि मुळात तुम्ही त्यांच्या विरोधात नेहमी होता.तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही.हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व जनता यांनाच आहे.


ते पुढे म्हणाले,पक्षाचे नेते अजितदादा पवार म्हणतात दिलीपराव तुम्हीच निवडणुक लढवावी,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणतात आण्णा तुम्हीच आम्हाला निवडणुकीला उमेदवार म्हणुन पाहिजे.ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता म्हणत नाही की आण्णा तुम्ही नविन उमेदवार द्या किंवा तुम्ही थांबा.आण्णा तुमच्या रुपाने तालुक्याला मंत्री पदाची संधी आहे. तुमचे प्रशासकीय ज्ञान चांगले आहे.तालुक्याचा विकास करण्यासाठी आण्णा तुम्हीच पहिजे.राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यातील जनता,भारतीय जनता पक्ष,शिवसेना पक्ष, आरपीआय पक्ष यांचे पदधिकारी व कार्यकर्ते सगळेच जण एकरुपाने आण्णा सोबत उभे आहेत.समोरच्या उमेदवाराला मला विनंती करायची आहे की बाबा तुला अण्णांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. तुमच्या स्टेजववर जे लोक बसलेले आहेत.त्या स्टेजवर काय गमती जमती चाललेल्या आहेत.हे तुम्ही पहिले बारकाईने बघ आणि मग महायुतीच्या उमेदवारावर अन्याय कर.


ते पुढे म्हणाले की,सोसायटी,मार्केट,बँक सगळीच पदे यांना पाहिजे अशी टीका ते करतात. पण बाजार समितीची निवडणुक लढवायची असेल तर पहिले सोसायटीवर निवडून यावे लागते. आण्णा सोसायटीचे संचालक झाले.बाजार समितीवर निवडूण आले.राज्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या रूपाने राज्याच्या बाजार समितीचे अध्यक्षपद तालुक्याला मिळाले.अध्यक्ष झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले.पी.डी.सी.सी.बँकेवर संचालक होण्यासाठी सोसायटीचे प्रतिनिधि असावे लागते आणि मग बँकेवर निवडूण येता येते. आण्णा बँकेवर संचालक झाल्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध झाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.तालुक्यातील बँकांच्या शाखांचे नूतनीकरण केले.अजित दादा पवार,दिलीप वळसे पाटील,अशोक पवार,रमेश थोरात हे सगळे नेते पी.डी.सी.सी. बँकेवर काम करत आहेत.तुम्हाला जर या संस्थांचे ज्ञान नसेल,रचना माहीत नसेल तर तुम्ही आरोप कशाच्या धर्तीवर करता असा प्रश्न उपस्थित करून केवळ लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम सुरु आहे.


कुठल्याही प्रकारची विकास कामे करताना त्याचे ज्ञान असावे लागते.छोटी मोठी कामे तर सगळेच करतात.पण गेल्या अनेक वर्षापासून न झालेली विकास कामे करण्याचा प्रयत्न आण्णांनी केला.विकासकामे करताना प्रशासनावर वचक लागतो, नेता पाठीमागे लागतो या सगळ्या गोष्टी आण्णा यांच्याकडे आहे अजितदादा यांच्यासारखा नेता त्यांच्या पाठीमागे उभा आहे.पत्र गेले शिफारस केली म्हणजे काम मंजुर झाले असे कधी होत नाही.त्या खात्याच्या मंत्र्याची मंजुरी लागते.मंत्रिमंडळ बैठकीत हे सगळे निर्णय होत असतात आणि मग मोठी कामे मंजुर होत असतात. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या प्रत्येक टीकेला प्रती उत्तर बुट्टेपाटील यांनी दिले.