Crime | आळंदीत जुन्या भांडणाचा राग मनात; दोघांवर दगडाने हल्ला, एकावर गुन्हा दाखल
आदल्या दिवशीच्या वादाचा राग मनात धरून दगडाने केली मारहाण; दोघे जखमी, आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल.
महावार्ता लाईव्ह | आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीने रस्त्यावरील दगडाने दोघांना मारहाण करून जखमी केल्याची घटना आळंदीत घडली आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील पीएमटी चौकातील गणेश मंदिरासमोर हा प्रकार घडला असून, याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महादेव दौलत कोळेकर (वय ६५, व्यवसाय मजुरी, रा. वारकरी मिसळ समोर फुटपाथवर, आळंदी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग कृष्णा चोपडे (वय ५५, व्यवसाय मजुरी, रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाच्या माहितीनुसार , २३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास आरोपी पांडुरंग चोपडे याने आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादी महादेव कोळेकर यांना मारहाण केली. यामध्ये कोळेकर यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला दुखापत झाली. तसेच, आरोपीने फिर्यादी यांचे मित्र संतोष रंगनाथ चालक (वय ४१) यांनाही दगडाने मारहाण केली असून, त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला दुखापत झाली आहे.