राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या खेड तालुका सरचिटणीसपदी अनिल राक्षे यांची नियुक्ती
राजगुरूनगर वकीलबार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विधिज्ञ अँड.अनिल भिमाजी राक्षे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
राजगुरुनगर: राजगुरूनगर वकीलबार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि शहरातील जेष्ठ विधिज्ञ अँड.अनिल भिमाजी राक्षे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व असोसिएशनने त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर पाटील यांनी राक्षे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.राक्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आमदार मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.आमदार दिलीप मोहिते पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर पाटील,बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे,राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष होले, युवकचे तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर,राक्षेवाडीचे पोलीसपाटील पप्पूकाका राक्षे,अभिनाथ शेंडे आदिसह तालुक्यातील पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर निष्ठा ठेवून पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. - नवनिर्वाचित सरचिटणीस अनिल राक्षे
