Khed | राजगुरुनगर येथे महिलांना साड्यांचे वाटप
माऊली सेवा प्रतिष्ठान व सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नवीन साडी भेट देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
राजगुरूनगर : येथील रस्त्यावरील भंगार गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एकूण ३३ महिलांना माऊली सेवा प्रतिष्ठान तसेच सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नवीन साडी भेट देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
गरजु महिलांना मोफत वाटप करण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठानकडे या नवीन साड्या आदर्श शिक्षिका वैशाली मुळूक-रणपिसे मॅडम,परिवहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी मोहन मुळुक यांच्या सहकार्याने तसेच खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थाचे संचालक सुनील वाघ यांच्या माध्यमातून महिलांना नवीन साड्या जमा केल्या.याचे वाटप माऊली सेवा प्रतिष्ठानच्या राजगुरुनगर कार्यालयात केले.तसेच सर्व महिलांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती. नवीन साड्या घेऊन जाताना कार्यालयातील जुने कपडे देखील त्या सर्व महिलांनी मोठ्या आनंदाने घेतले.
यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, मंत्रालयातील शासकीय अधिकारी भरत जैद,आदर्श मुख्याध्यापक व साने गुरुजी विचारमंचाचे सदस्य संजय घुमटकर सर,सामाजिक कार्यकर्ते निलेश घुमटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
