खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी बंदचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा क्रांती मोर्चाचे आयुक्तांना निवेदन

खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी बंदचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

 

महावार्ता लाईव्ह | अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेड तालुक्यातील एमआयडीसी तसेच त्यातील सर्व कंपन्या सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी बंद ठेवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

जाहिरात 

 

याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरी-चिंचवड आयुक्तांना (दि.५) रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासन दरबारी अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. शासनाने त्यांच्या उपोषणाची दोन दिवसांत दखल घेतली नाही, तर सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ पासून खेड तालुक्यातील एमआयडीसी आणि त्यातील सर्व कंपन्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेत त्यांची सर्व मागणी पूर्ण करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.

 

मराठा क्रांती मोर्चाच्या या निवेदनावर मनोहर महादेव वाडेकर, अशोक मांडेकर, कुशल जाधव, बाबाजी कौटकर, चेतन शेटे आणि अरुण कुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.