टपरी पथारी हातगाडी पंचायत संघटनेच्या आळंदी शहराध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार एम.डी.पाखरे यांची निवड.
आळंदीतील व्यवसायकांनी केले पाखरे यांच्या निवडीबद्दल स्वागत.
महावार्ता लाईव्ह -
पोटाची खळगी भरण्यासाठी आळंदी शहर परिसराच्या हद्दीतील रस्त्यालगत व्यवसाय करणारे टपरी,पथारी व हातगाडी धारकांना न्याय व हक्कासाठी संघटना असून टपरी पथारी हातगाडी पंचायत संघटनेच्या आळंदी प्रभारी शहराध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार महादेव (एम.डी) पाखरे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल आळंदीतील व्यवसायकांनी आनंद व्यक्त केला.
टपरी पथारी हातगाडी पंचायत संघटनेचे जिल्ह्यध्यक्ष बाबा कांबळे यांनी आळंदी प्रभारी शहराध्यक्षपदी महादेव (एम.डी.) पाखरे यांना नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. काही महत्वाच्या कारणामुळे टपरी पथारी हातगाडी पंचायत पिंपरी चिंचवड,पुणे व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.लवकरच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत.आळंदी शहरासाठी प्रभारी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पाखरे यांची निवड केल्याचे कांबळे यांनी सांगितले.तसेच यापुढे कोणीही आपले पद लावू नये,असा निर्णय संघटनेच्या झालेल्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला.
आळंदी मध्ये पाखरे गेले २५ वर्षांपासून पत्रकारीता करीत असून त्यांच्या लेखणीने अनेकांना न्याय मिळाला. सत्याची कास धरून अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य पाखरे यांच्याकडून होत आहे.पत्रकारितेसह समाजाच्या हितासाठी पाखरे काम करतात.त्यांच्या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्थरातील नागरिकांसह व्यवसायकांनी आनंद व्यक्त केला.
--------------------------------------------------------------------------
