छापा टाकून प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या इसमाला पकडले.२ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त.

राजगुरूनगर - प्रतिनिधी
राजगुरूनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने राजगुरूनगर येथील पाबळरोड येथे छापा टाकून प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या इस्माईल नबीनूर अन्सारी (वय ३७) रा.अमरदीप अपार्टमेंट,पाबळरोड,ता.खेड,जि.पुणे या इसमाला मुद्देमालासह अटक केली असून त्याच्याकडून २ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या बाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल निलेश दत्तात्रय सुपेकर,बक्कल क्रमांक ३०५५ यांनी राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली.फिर्यादीनुसार भा.द.वि.कलम 328,272, 273,188,अ.सु.अधि.कलम 26,27,30 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
87,120 रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला, निळे पिवळे रंगाचे एकुण 440 मोठे पाकीटे,प्रत्येकी 154 ग्रॅम वजनाचे व प्रत्येकी 198/ रुपये किंमत असून आहे. तसेच 9,680/ विमला 1 तम्बाकू,निळे पिवळे रंगाची एकुण 440 पाकीटे, प्रत्येकी 22/ रुपये किंमत असून प्रत्येक गुटका पाकीटावर इंग्रजीत Chewing of the pan masala in is injurious to health,not for minors,tobacco kills असे लिहीलेला छापील मजकुर आहे.१ लाख ७० हजार रुपये किंमत असलेली महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन जप्त केले.
अन्नसुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधीत आदेष क्र.असुमाअ/अधिसुचना/794/1807 दिनांक 20.7.2018 चा असुमाअ/अधिसुचना/795/18/07 दि.20.7.2018 नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा,पानमसाला,स्वादिष्ट तंबाखु, सुपारी यामुळे मुखाचा कर्करोग,ओरल सबम्युकास, फायब्रोसीस गुणसुत्रातील विलाग्र इत्यादी शारीरिक हाणी होत असल्याने त्याचे उत्पादन,साठा,वितरण,वाहतूक विक्री, यावर बंदी घातली असताना सदर आदेषाचे उल्लंघन करून आपले ताब्यातील महिंद्रा मक्झीमो गाडी नं.एम.एच.14, डी.एम.0889 मध्ये विक्री करीता प्रतिबंधीत असा एकुण 2,81,060/-रूपये किंमतीचा गुटखा,पानमसाला वाहनासह किंमत असे विक्री करण्याचे उददेषाने जवळ बाळगले स्थितीत वाहतुक करताना मिळून आला.म्हणून माझी सदर इसमाविरूद्ध मा.पोलीस महासंचालक म.रा.मुंबई यांचेकडील आदेष क्र.पोमसं/22/प्रतिबंधीत अन्न पदार्थ बंदी/कारवाई/633/2018.2020 मुंबई दि.16.7.2020 अन्वये भा.दं.वि.क. 328, 272,273,188, अन्न सुरक्षा अधि.कलम 26, 27, 30 प्रमाणे कायदेषीर फिर्याद आहे.
या गुन्ह्याचा तपास राजगुरूनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले करीत आहेत.
------------------------------------------------------------------