हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन यांच्याकडून दुर्गम भागात ब्लँकेट आणि कपड्यांची मदत
राजगुरूनगर : श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील पदरवाडी, फणसवाडी, येळवली तसेच विठ्ठलवाडी परिसरात हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन च्या वतीने ब्लँकेट आणि कपडे वाटप करण्यात आले.
अतीदुर्गम भागातील कुटुंबांना कडाक्याच्या थंडीत ऊब मिळावी व थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून फाऊंडेशन च्या वतीने सुमारे ११० नवीन ब्लँकेट आणि लहान मुलांचे कपडे वाटण्यात आले. ह्या कामी श्री. सुभाष मल्हारी होले यांचे कडून ५० ब्लँकेट ची मोठी मदत मिळाली, तसेच सारा इंटरनॅशनल स्कूल कडून लहान मुलांचे कपड्यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रम हा दळणवळणाची साधने नसलेल्या अतिशय दुर्गम भागात राबविण्यात आला.
यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. दिलीप होले, उपाध्यक्षा सौ. संगीता तनपुरे, कार्याध्यक्षा डॉ. नीलम गायकवाड, संचालक श्री. संतोष सांडभोर, श्री. मधुकर गिलबिले, सौ. नाजनीन शेख, राहुल मलघे, अक्षय बोंबले आदी उपस्थित होते.
