Khed | चाकण भाजपकडून जल्लोष ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
चाकणमध्ये केंद्र सरकारच्या जात निहाय जनगणना निर्णयाचे स्वागत ; नरेंद्र मोदी सरकारचा धाडसी निर्णय

Bjp pune Gramin Modi Government congratulation
महावार्ता लाईव्ह | केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जात निहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी (भाजपा) चाकण शहर मंडलाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. या निमित्ताने पेढे वाटून, घोषणाबाजी करत आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत हा निर्णय सर्व जातींना न्याय मिळवून देणारा ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
जात निहाय जनगणनेचे महत्त्व
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील म्हणाले, "१९३१ पर्यंत भारतात जात निहाय जनगणना होत होती. परंतु, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने अशी जनगणना कधीही केली नाही. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत फक्त अनुसूचित जाती आणि जमाती यांची मोजणी केली जात होती. ओबीसीसह इतर संवर्गाची जनगणना मात्र टाळली गेली. काँग्रेसने अनेकदा घोषणा करूनही हा विषय पुढे नेला नाही. काही राज्यांनी स्वतंत्रपणे अशी जनगणना केली, पण त्यांनी आकडे कधीच जाहीर केले नाहीत.
मोदी सरकारचा धाडसी निर्णय
शरद बुट्टे पाटील यांनी पुढे सांगितले की, "नरेंद्र मोदी सरकारने हा धाडसी आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. या जनगणनेमुळे सर्व जातींना न्याय मिळेल. अचूक आकडेवारीच्या आधारे सरकारला योजना आखता येतील. समाजातील दुर्लक्षित आणि छोट्या घटकांना न्याय मिळेल. ज्या भागात कोणता समाज जास्त आहे, तिथे त्यानुसार योजना आणि निधी उपलब्ध होईल. विशेषतः ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अचूक आकडेवारीमुळे असे दावे टाळता येतील आणि राजकीय आरक्षण योग्य पद्धतीने लागू होईल. यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही.
भाजपकडून जल्लोष आणि आभार
या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी चाकणमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये भाजपा चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर, खेड ग्रामीण मंडल अध्यक्ष सुनिल देवकर, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्याम पुसदकर, जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे, माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, खरेदी-विक्री संघ उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष काळुराम पिंजण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रशांत शेवकरी, शहर उपाध्यक्ष मनोज बिसणारे, जयदेवसिंग दुधाणी, ज्ञानेश्वर बढे, दत्ता परदेशी, पंढरीनाथ सुतार, नसरुद्दीन इनामदार, प्रविण कर्पे, किशोर अहिरे, नसीम पठाण, योगेश देशमुख, संतोष ओतारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अमृत शेवकरी, श्याम पुसदकर, अनिल सोनवणे आणि अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी या निर्णयामुळे सामाजिक समतोल आणि विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदेश जाधव यांनी केले.