पुण्यासह 'या' जिल्ह्यात पुन्हा पावसाची सुरवात

राज्यात पावसाचा जोर वाढणार

पुण्यासह 'या' जिल्ह्यात पुन्हा पावसाची सुरवात

पुणे : प्रतिनिधी

राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहेत. त्यानंतर आता अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

सध्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील बहुतांशी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच सोमवारी (29 नोव्हेंबर ) हवामान खात्याने पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सोमवारी (29 नोव्हेंबर) मुंबईसह, उस्मानाबाद, लातूर, ठाणे, नाशिक आणि नांदेड या सहा जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.