खेड तालुक्यातील १९ जि. प शाळांना अवांतर पुस्तकांचे वाटप .
वाचनवेड संस्था (पुणे) यांचे माध्यमातून व अभंग प्रतिष्ठान (देहू) यांच्या पुढाकाराने जि. प.शाळांना पुस्तकांचे वाटप.
राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क
खेड तालुक्यातील १९ जिल्हा परिषद शाळांना १७७४ अवांतर वाचनाची पुस्तके वाचनवेड संस्था (पुणे) यांचे माध्यमातून व अभंग प्रतिष्ठान (देहू) यांच्या पुढाकाराने महिलादिनचे औचित्य साधून पिंपरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
अवांतर वाचनाची पुस्तके वाटप प्रसंगी ह.भ.प. सुप्रिया ठाकूर, पंचायत समिती उपसभापती वैशाली जाधव, जि.प.सदस्य बाबाजी काळे, कैलास गाळाव, मंगेश सावंत, अभंग प्रतिष्ठानचे सागर मोरे, सचिन कुंभार, प्रा.विकास कंद, सचिन काळोखे, अमोल काळोखे, लक्ष्मण काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.परंतू अवांतर वाचनसाहित्य उपलब्ध होत नाही,म्हणून वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे, मयूर सेठ, हर्षद सुराणा, सांभव भाटिया, दिपेन जैन व संतोषी मित्र मंडळ(पुणे) यांनी शाळांना पुस्तके उपलब्ध करुन दिली.
संस्कार ही काळाची गरज असून पुस्तकांचे मानवी जीवनातील योगदान हे अनन्यसाधारण असल्याचे मत बाबाजी काळे यांनी व्यक्त केले.चारित्र्य व समाजकार्य ही माणसाची खरी संपत्ती असून त्यासाठी सातत्याने वाचन महत्वाचे असल्याचे प्रा.विकास कंद म्हणाले.
पुस्तकांशी आपली मैत्री जुळली की मग पुस्तके जन्मभर आपली साथ-संगत करीत राहतात.पुस्तकाचे जग विशाल,अथांग असून भूत,वर्तमान,भविष्यकाळाचे वेध घेणारे व साक्षात्कार घडवणारे असल्याचे विचार हभप ठाकूर यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक विकास ठाकुर यांनी केले. सुत्रसंचालन दिलीप ढमाले यांनी केले.आभार खोडदे मॅडम यांनी मानले.
-----------------------------------------------------------------------
