Shirur loksabha | भाजप नेते अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

खेड तालुक्यात भाजपला धक्का ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश

Shirur loksabha | भाजप नेते अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

 

राजगुरुनगर | खेडचे भाजप नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गुरुवारी (दि.११) पुणे शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी देशमुख यांच्या समवेत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. यामुळे खेड तालुक्यात भाजपाला धक्का बसला आहे.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे,जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधीर मुंगसे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

शिरूर लोकसभा निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम न करण्याचा व भाजपाच्या अंतर्गत वादामुळे मागील दोन दिवसांपूर्वी भाजप नेते अतुल देशमुख यांनी त्यांच्याकडे असलेल्या भाजपाच्या विधानसभा निवडणुक प्रमुख व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

 

भाजपाला सोडताना दुख होतेय मात्र मागच्या दिड वर्षापासुन भाजपातील अंतर्गत कुरघोडी आणि ताकद मिळत नसल्यामुळे भाजपातुन बाहेर पडत असुन ८२ वर्षाच्या योद्धाच्या सोबत अमोल कोल्हेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहाण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे आज शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अतुल देशमुख - माजी जिल्हा परिषद सदस्य