बंदुकीतून गोळ्या झाडल्या ; कोयत्याने वार पिंपरीतील गुंडाचा खून
इंदापुरातील जगदंब हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी धनवे मित्रांबरोबर बसला होता ; अचानक मागून गोळ्या झाडल्या कोयत्याने केले वार गुंडाचा जागीच मृत्यू झाला

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील गुंडाचा इंदापूरमधील हॉटेलमध्ये शनिवारी रात्री पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवायला थांबलेल्या गुंडावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून केला.पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके रवाना केली.
▶️ Watch this reel
https://www.facebook.com/share/r/QCZNYH7E5yddXXPS/?mibextid=D5vuiz
अविनाश बाळू धनवे (वय ३०, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, पिंपरी-चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. अविनाशविरुद्ध पिंपरी-चिंचवड शहरात पाच ते सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. अविनाश आणि त्याचे मित्र शनिवारी मोटारीतून पंढरपूरकडे निघाले होते. रात्री आठच्या सुमारास ते इंदापुरातील जगदंब हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. अविनाश याच्यावर हल्लेखोरांनी पाळत ठेवली होती. हाॅटेलमध्ये मित्रांसोबत अविनाश गप्पा मारत थांबला होता. त्यांनी जेवण मागविले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी खुर्चीत बसलेल्या अविनाशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले.
हल्लेखोर हॉटेलबाहेर लावलेल्या मोटारीतून पसार झाले. हॉटेलमध्ये गोळीबार झाल्यानंतर घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. तातडीने हल्लेखोरांना पकडण्याच्या सूचना दिल्या. पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. प्राथमिक चौकशीत अविनाशचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.