भाजपाच्या युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी काळूराम पिंजन यांची निवड
राजगुरुनगर
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी खेड तालुक्यातील भांबोली गावचे काळुराम पिंजन यांची निवड करण्यात आली.तालुक्यासह जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्त्यांनी पिंजन यांचे स्वागत करीत अभिनंदन केले.
युवामोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले पिंजन हे भांबोली-शेलू विकास सोसायटीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक असून खेड तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष आहेत.तसेच यापूर्वी त्यांनी भाजपा खेड तालुका युवामोर्चाचे तालूकाध्यक्ष म्हणून त्यांनी चार वर्ष यशस्वी काम केले.अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम केल्याने पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची संधी दिली.पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ता म्हणून पिंजन ओळखले जातात.काळुराम पिंजन यांच्या पत्नी शितल पिंजन या भांबोली गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
युवामोर्चा भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी पिंजन यांची युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना निवडीचे पत्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शरद सातव,शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद, माजी आमदार बापूसाहेब पठारे, क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पै.संदीपआप्पा भोंडवे ,रोहिदास उंद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ ,तालुकाध्यक्ष शांतराम भोसले ,दत्तात्रय मांडेकर, सुनील देवकर आदी उपस्थित होते.
युवा वर्गासह तरुणांना बरोबर घेऊन तालुक्यासह जिल्ह्यात युवामोर्चाचे संघटन वाढविणार आहे.भाजपा पक्षाचे वरिष्ठ नेते यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे काळुराम पिंजन यांनी सांगितले.
