कोरोना प्रतिबंधक लसीचा पाचवा कॅम्प संपन्न.६० जणांनी घेतला लसीचा डोस. देविदास शिंदे पाटील यांची माहिती.
राजगुरूनगर : प्रतिनिधी
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालयाचे ठिकाणी खेड बार असोसिएशचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अँड.देविदास शिंदे पाटील यांचे विशेष प्रयत्नातुन लसीकरणाचा पाचवा कॅम्प संपन्न होऊन ६० जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
लसीकरण कॅम्पचे उद्घाटन जिल्हा न्यायाधिश अंबाळकर साहेब व वकील संघाचे अध्यक्ष अँड. देवीदास शिंदे पाटील यांचे हस्ते झाले.बारचे वकील, न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण झाले.यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड.गणेश गाडे,अँड.रिना मंडलीक,सदस्य अँड.शुभम घाडगे,अँड.स्नेहल पवळे, अँड.बी.एम सांडभोर,अँड.दिलीप करंडे,अँड.अरुण मुलुक,अँड.पोपटराव तांबे,अँड.रमेश गोकुळे अँड. दिपक चौधरी,अँड.संदीप घु ले,अँड.विलास मेदनकर, अँड.संकेत सांडभोर साहेब,अँड.योगेश साबळे,अँड. आदींनाथ कड,अँड.पवन कड आदी वकील आणि सभासद,राजगुरूनगर बार असोसिएशन नवनिर्वाचीत कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित बार असोसिएशनचे देवीदास शिंदे पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जोरदार कार्यक्रम सुरू आहेत.शिंदे यांच्या कार्याचे वकील वर्गातून जोरदार स्वागत होत आहे.
