Zp election khed | नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद गटात गणेश बोत्रे व पंचायत समिती गणात अश्विनी तरस यांची प्रचारात आघाडी
महाळुंगे पंचायत समिती गणातून अश्विनी तरस यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा
Zp election Ganesh Botre, Ashwini Taras
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील महाळुंगे नाणेकरवाडी हा जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचा महाळुंगे गण हा औद्योगिक क्षेत्रातील असल्याने हा गट हाय व्होल्टेज म्हणून ओळखला जात आहे. या गटातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून युवानेते पै.गणेश बोत्रे आणि महाळुंगे या पंचायत समितीच्या गणातून सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी तरस या उतरल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून बोत्रे आणि तरस यांची उमेदवारी फायनल असल्याने त्यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.तर अन्य पक्षाचा विचार करता शिवसेना शिंदेगट, शिवसेना उबाठा,भाजपा या पक्षाकडून अनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चाचपणी करीत आहेत.
खरंतर हा गट संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचा पट्टा असल्याने आणि बाहेरचा कामगार वर्ग देखील परिसरातील गावात घर बांधून मोठ्या प्रमाणात स्थायिक झाल्याने बाहेरचे मतदार प्रचंड वाढलेले आहेत.यामुळे सध्यातरी उमेदवारांसमोर बाहेरचे मतदारांना शोधणे हे मोठे आव्हान बनले आहे. महाळुंगे नाणेकरवाडी या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवानेते आणि कुस्तीच्या मैदानात कसलेले पैलवान म्हणून ज्यांची तालुक्यात ओळख आहे असे खालूंब्रे गावचे सुपुत्र गणेश बोत्रे हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होऊन रिंगणात उतरले आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम व ताकदीचा पैलवान उमेदवार असल्याने बोत्रे यांचे मोठे आव्हान प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर राहणार यात शंका नाही. तसेच महाळुंगे या पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी सावरदरी गावचे प्रतीथयश उद्योजक सोमनाथशेठ तरस यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई तरस रिंगणात उतरल्या आहेत. सोमनाथशेठ तरस यांची सावरदरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आहे. त्यांचे बंधू भरत तरस यांनी सरपंच म्हणून यशस्वी काम केले. तरस घराण्याचा परिसरात नावलौकिक आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही,तरीही बोत्रे आणि तरस यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराची रणधुमाळी सुरु केली. प्रत्येक गावात खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रम झालेत. तसेच उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन यात्रा नागरिकांना घडवून आणली आणि नागपूर येथील दीक्षाभूमी व अन्य ठिकाणी दर्शन यात्रा काढून प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.
गणेश बोत्रे आणि अश्विनी तरस यांचे परिसरातील गावात नातेगोत्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.अश्विनी तरस यांच्यासाठी संपूर्ण सावरदरी गाव एकवटले असून गावाने त्यांना एकमुखी पाठिंबा दिला. गावातील प्रमुख कार्यकर्ते मतभेद विसरून गावच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत.बोत्रे यांचा देखील मोठा चाहता तरुण वर्गाची फळी प्रचारात सक्रिय झाली आहे. एकंदरीत महाळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून गणेश बोत्रे यांचे आव्हान मोठे तगडे मानले जात आहे तसेच महाळुंगे पंचायत समिती गणातून अश्विनीताई तरस या निवडणुकीच्या रिंगणात आल्याने त्यांच्यापुढे कोण उमेदवार राहणार हा मोठा प्रश्न आहे. तरस आणि बोत्रे यांना निवडणुकीपूर्वीच मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा यामुळे बोत्रे आणि तरस यांना निवडणुकीचे वातावरण अनुकूल बनले आहे.
