वृक्षारोपणातून साजरा झाला अविनाश कहाणे यांचा वाढदिवस; ढुम्या डोंगरावर पिंपळ-उंबराची लागवड
खेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा ; सहकार, समाजकारण आणि पर्यावरणाचा सुंदर संगम ठरला वाढदिवस सोहळा
महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक अविनाश कहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ढुम्या डोंगरावर पिंपळ व उंबर या पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचा संदेश देत साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवस सोहळ्यास खेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अविनाश कहाणे हे सामाजिक व सहकार क्षेत्रातील सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक असून उत्तर पुणे जिल्हा प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तसेच राजगुरूनगर तेली समाज संस्थेचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ढुम्या डोंगरावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत परिसर हरित ठेवण्याचा संकल्प केला.

या प्रसंगी ढुम्या गिरिभ्रमण मंडळाचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, कार्याध्यक्ष व उद्योजक माऊलीशेठ करंडे, सचिव व पत्रकार दत्ता भालेराव, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, ॲड. रामचंद्र घोलप, प्रदीप सारडा, लाला सावंत, शामकांत खळदकर, रमेश तापकीर, दत्तात्रय वडगावकर, सोपान राक्षे, सुधाकर जाधव, जयंत घोरपडे, अजित डोळस, शंकर बोंबले, सुधीर येवले, बाळा होले, शशिकांत गिलबिले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी सोपान चव्हाण यांचाही वाढदिवस याच कार्यक्रमात साजरा करण्यात आला.
यानंतर अविनाश कहाणे यांच्या कार्यालयात शुभेच्छा स्वीकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक किरण आहेर, गणेश थिगळे, दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, विजय डोळस, समीर आहेर, विनायक घुमटकर, राहुल तांबे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, नगरसेवक निलेश घुमटकर, ॲड. चेतन घुमटकर, ॲड. मुकुंदराव आवटे, अनिल कहाणे, नितीन कहाणे, कैलास कहाणे, रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगरचे अध्यक्ष अविनाश कोहिनकर, अजित वाळुंज, विठ्ठल सांडभोर, जितेंद्र गुजराती, गणेश घुमटकर, निलेश गवते, उत्तम कुंभार, दत्ता रूके, नरेश हेडा, मिलिंद शिंदे, संतोष शिंदे, प्रा. मयूर घुमटकर, नामदेव कहाणे, दिलीप लोखंडे, गणेश कहाणे, प्रशांत घुमटकर, लक्ष्मण वाव्हळ, प्रदीप करपे, पवन कासवा, किशोर मावळे, सनी सरडे, बंडू जंगम, विकास भुजबळ, सुहास दाभाडे, मंगेश कहाणे, योगेश कहाणे, बाळासाहेब कहाणे, सागर कहाणे, गोपीचंद गायकवाड, शितल येवले, समृद्धी येवले, अजय थिगळे, रुपेश खांगटे, गणपत पाटोळे, अशोक चव्हाण, यशवंत घुमटकर, ताराचंद दहीतुले, अशोक कहाणे, धनेश सरडे, मिलिंद आहेर, प्रशांत कर्णावट, कृषी अधिकारी संजय फल्ले, डॉ. केतन घुमटकर, अहमद अन्सारी, प्रवीण वायकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कहाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी अविनाश कहाणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या वृक्षारोपण उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.