Chakan | पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकल येथे विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

अभ्यासात रुची वाढवून ध्येयनिष्ठ वाटचाल करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव - राजे यांनी विध्यार्थ्यांना केले

Chakan | पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकल येथे विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

Podar International School rohkal

 

महावार्ता लाईव्ह | रोहकल (ता. खेड) येथील पोदार इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व कौशल्य आणि जबाबदारीची जाण विकसित व्हावी यासाठी स्टुडंट कौन्सिल इलेक्शन घेण्यात आले. या निवडणुकीत हेड बॉय, हेड गर्ल, स्पोर्ट्स कॅप्टन, सांस्कृतिक सचिव, हाऊस कॅप्टन आदी पदांसाठी एक हजार विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पारदर्शकपणे मतदान केले.
 

विद्यार्थी पदग्रहण सोहळ्यात निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना राजगुरूनगर पोलीस स्टेशनच्या उपपोलीस निरीक्षक स्नेहल गुरव-राजे, म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जायभाय,माजी विद्यार्थिनी अनुष्का पठारे, आर्या भास्कर व प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते बॅज आणि स्याश देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी इग्निस, वेंटस, टेरा आणि अक्वा हाऊसच्या हाऊस मास्टर्स, तसेच विवेक पिसाळ, अमृता पोतदार, शीतल नलावडे, महेश मोरे, धीरज पाटील आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या इयर लीडर्स प्रिया पिसाळ, शोमी चौधरी, पौर्णिमा तिवारी, उपासना आंधळे, पूजा कदम यांनाही बॅज देऊन सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा उपासना आणि अक्षदा जगताप यांनी केले, तर अमृता पोतदार यांनी आभारप्रदर्शन केले. शालेय सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.