शिरोली जि.प.शाळेची कु.सरस्वती राठोड जवाहर नवोदय परीक्षेत यशस्वी

शिरोली जि.प.शाळेची कु.सरस्वती राठोड जवाहर नवोदय परीक्षेत यशस्वी

राजगुरूनगर : प्रतिनिधी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत शिरोली (ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील कु.सरस्वती वन्ना राठोड या विद्यार्थ्यांनीचा ५ वा क्रमांक मिळविला आहे.या विद्यार्थिनीचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
         शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कु.सरस्वती वन्ना राठोड या विद्यार्थीनीने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या काळात कोरोनामुळे शाळा बंद होत्या.शाळा बंद असतानाही राठोड हिने घरीच अभ्यास करत गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक पटकावला आणि जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे.
       या विद्यार्थीनीचे आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट गरिबीची असल्याने मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात.गरीब परिस्थित असतानाही आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ते अपार कष्ट करतात.या विद्यार्थिनीने अशा परिस्थितीत मिळवलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. शिरोली शाळेचे व शिक्षकांचे नाव तिच्या यशामुळे उंचावले आहे,असे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
         मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत शिरोलीच्या बारा विध्यार्थ्यांनी राज्य,जिल्हा व केंद्रस्तरावर घवघवीत यश मिळवून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली.गटशिक्षणाधिकारी नाईकडे,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय देखणे,उपाध्यक्षा जया दजगुडे,शाळेचे मुख्याध्यापक राजेश कांबळे,वर्गशिक्षिका लीला डावरे,शाळेचे शिक्षकवृंद, व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी कु सरस्वती राठोड व अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.