Cooperative Society Election | शिरोली विकास सोसायटीच्या चेअरमनपदी देवराम वाडेकर, व्हाईस चेअरमनपदी शोभा वाडेकर बिनविरोध

माजी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी देवराम वाडेकर आणि उपाध्यक्षपदी शोभा वाडेकर यांची एकमताने निवड; सभासदांच्या हितासाठी पारदर्शक कारभाराचा निर्धार

Cooperative Society Election | शिरोली विकास सोसायटीच्या चेअरमनपदी देवराम वाडेकर, व्हाईस चेअरमनपदी शोभा वाडेकर बिनविरोध


महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शिरोली विकास सोसायटीच्या चेअरमनपदी देवराम गोविंदराव वाडेकर यांची तर व्हा.चेअरमनपदी श्रीमती  शोभा राजेंद्र वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली.चेअरमन व व्हा.चेअरमन पदांची बिनविरोध निवडी आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.


तुकाराम गणपत सावंत यांनी सोसायटीचे अध्यक्षपदाचा तर शंकर लोखंडे उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदांची निवडणूक राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यासी अधिकारी सुभद्रा बगाटे यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.अध्यक्षपदासाठी देवराम वाडेकर आणि उपाध्यक्षपदासाठी शोभा वाडेकर यांचेच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा बगाटे यांनी सोसायटी संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळते अध्यक्ष तुकाराम मावळते उपाध्यक्ष शंकर लोखंडे, सोसायटीचे संचालक शांताराम मलघे, वसंतराव वाडेकर, मारुती बेंढाले, भानुदास पवळे, अँड  मच्छिद्र उमाप, नारायण सावंत, नामदेव शिंदे, माजी सरपंच मारुती सावंत, गोरक्षनाथ सांडभोर, संजय सावंत, संतोष खरपासे, दत्तात्रय वाळूज,जितेंद्र शिंदे, संजय देखणे, खरेदी विक्री संघाचे संचालक कल्याणशिल देखणे, पोलीस पाटील निर्मला देखणे, हरेश देखणे, कुलस्वामिनी अंबिका पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अतुल राक्षे, उपाध्यक्ष भानुदास सावंत, नामदेव वाडेकर, सोमनाथ वाडेकर,जितेंद्र वाडेकर, संदीप वाडेकर, संपत मलघे यासह सोसायटी सचिव दत्तात्रय मूळूक, शिरोली ग्रामपंचायत सदस्य, कुलस्वामिनी पतसंस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


खेड तालुक्यात शिरोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा नावलौकिक आहे.गावातील अनेक मान्यवरांनी चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालक अशी पदे भूषविली आहेत.सोसायटीचा कारभार पारदर्शक व स्वच्छ राहिला आहे. सोसायटी सभासदांचे हीत जोपासून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज पुरवठा सोसायटीच्या माध्यमातून केला जातो.कर्जाची परतफेड वेळेत होताच सभासद शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा केला जातो.अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी सोसायटीचे कर्ज घेऊन आपल्या शेतामध्ये पिकांचे विविध प्रयोग राबविले आहेत.सोसायटीच्या माध्यमागून सभासद शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कार्य केले जाईल.
देवराम वाडेकर - चेअरमन, शिरोली विकास सोसायटी