लखीमपूर खेरीत शेतकऱ्यांना चिरडल्याचा निषेध करण्यासाठी कँडल मोर्चात सहभागी व्हावे : खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय डोळस.

लखीमपूर खेरीत शेतकऱ्यांना चिरडल्याचा निषेध करण्यासाठी कँडल मोर्चात सहभागी व्हावे : खेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय डोळस.

राजगुरूनगर : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडल्याचा निषेध करण्यासाठी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राजगुरूनगर येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धा कृती पुतळ्यासमोर कँडल मोर्चाचे आयोजन ११ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ७ वाजता केले आहे.या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे असे,आवाहन खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी केले आहे.
       या बाबतचे निवेदन आजच खेडचे तहसीलदार यांना विजय डोळस यांच्याकडून देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की,उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याने केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन महाराष्ट्र कॉग्रेस कमिटी तर्फे आज करण्यात आल्याने खेड तालुक्यात देखील काँग्रेस कडून बंद पाळण्यात आला.
    शेतकरी आणि कामगार भारताच्या विकासाची दोन चाके असून त्यांचा मान सन्मान राखला गेला पाहीजे.  बंदला पाठिंबा देवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ आहे.केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी प्रमुख मागणी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष डोळस यांनी केली.
-----------------------------------------------