लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा ; तरस परिवाराकडून मंदिर उभारणीसाठी एक लाख देणगी

भंडारा डोंगरावरील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारणीसाठी एक लाख एक हजार रुपये एकशे आकरा रुपये देणगी तरस परिवाराकडून देण्यात आला.

लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा ; तरस परिवाराकडून मंदिर उभारणीसाठी एक लाख देणगी

देणगीचा धनादेश बाळकृष्ण तरस यांनी मान्यवरांकडे सुपूर्द केला.​​​
 

राजगुरुनगर : लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सावरदरी (ता.खेड) येथील तरस परिवाराने भंडारा डोंगरावर जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारणीसाठी एक लाख एक हजार रुपये एकशे आकरा रुपये देणगीचा धनादेश दिला आहे.या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे वारकरी संप्रदाय व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य असलेल्या पवित्र भंडारा डोंगर येथे लोकवर्गणीतून जवळपास दीडशे कोटी रुपये खर्चाचे संत तुकाराम महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचे काम सुरु आहे.समाजातील दानशूर व्यक्ती यासाठी आर्थिक मदत स्वइच्छेने देत आहेत.खेड तालुक्यातील सावरदरी गावचे तरस परिवारातील मुलाचे लग्न नुकतेच पार पडले असून त्यांनी मंदिरासाठी देणगी देण्यासाठी लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा दिला.माजी सरपंच व वराचे आजोबा बाळकृष्ण तरस,चुलते तुकाराम तरस,सदाशिव तरस व वडील मधुकर तरस यांनी १ लाख १ हजार १११ लाख रुपये देणगी दिली आहे.

लग्न सोहळ्यात देणगीचा धनादेश जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे,माजी सभापती चंद्रकांत इंगवले,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,अमृत शेवकरी,माजी सरपंच संजय चौधरी, हभप पिंगळे महाराज,कैलास गाळव,बाजीराव हंबीर,गणेश तरस आदींच्या उपस्थितीत भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त जोपाशेठ पवार यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

सावरदरी येथील मधुकर बाळकृष्ण तरस यांचे चिरंजीव मयूर व दत्तू बळवंत बोत्रे यांची मुलगी तेजल यांचा शुभविवाह भंडारा लॉन्स कार्यालयात संपन्न झाला.सोहळ्याला समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व राजकीय पक्षाच्या नेत्यांची मोठी उपस्थित होती.यावेळी हभप पिंगळे महाराज यांनी वधुवरांना शुभाशीर्वाद दिले.

सावरदरी गावातील तरस आणि बोत्रे परिवार विविध क्षेत्रात कार्यरत असून या परिवाराने समाजाशी नाळ जोडलेली आहे. दोन्ही कुटुंब सुसंस्कृत असून उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. तरस व बोत्रे परिवारातील वधु आणि वर सुशिक्षित असून त्यांच्यावर कुटुंबाचे चांगले संस्कार झालेले आहेत.दानशूर असलेल्या तरस परिवाराने संत तुकाराम महाराजांच्या मंदिर उभारणीसाठी १ लाखाची देणगी दिली.या उपक्रमाबद्दल शरद बुट्टे पाटील यांनी तरस परिवाराचे कौतुक केले.