विकसित भारत देश बलशाली राष्ट्र म्हणून पुढे जातोय : उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक
शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर भाजपाचे संमेलन कार्यक्रम आयोजित ; निवडणुकीच्या तयारीचा घेतला आढावा
Developed India is moving forward as a strong nation: Deputy Chief Minister
चाकण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत देश सर्व क्षेत्रात बलशाली राष्ट्र म्हणून पुढे जात आहे.असे प्रतिपादन उत्तर प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी केले.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा प्रवास योजनेतर्गत भाजपचे निवडणूक प्रबंधन समिती,बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख,सुपर वॉरियर्स व मंडलातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना चाकण येथे आयोजित संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,भोसरीचे आमदार महेश लांडगे,पश्चिम महाराष्ट्र विभागीय महामंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार योगेश टिळेकर,भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप कंद,राम गावडे,अतुल भाऊ देशमुख,आशा बुचके,जयश्री पालांडे,प्रिया पवार,ताराचंद कराळे,संजय रौंधळ,भगवान शेळके आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले भाजपचा कार्यकर्ता हा पार्टीमध्ये महत्त्वाचा आहे.येणाऱ्या काळात शिरूरमध्ये कमळ फुलण्यासाठी प्रयत्न करा.असे आवाहन करून त्यांनी मोदींनी राबविलेल्या योजनांचा आढावा भाषणात घेतला.अयोध्यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा पाचशे वर्ष रखडलेले काम फक्त मोदीजींच्या नेतृत्वात झाले. २०१४ नंतर परिवर्तनाची लाट आल्यानंतर देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांना देशातून उखडून फेकण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना शरद बुट्टे पाटील यांनी प्रामुख्याने शिरूर लोकसभेतील विस्तृत माहिती पाठक यांना दिली.नरेंद्र मोदींच्या विकसित भारत तसेच वित्त आयोगाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत कशी पोहोचली जाईल याबाबत व शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या माध्यमातून माध्यमातून लाभ कसा मिळतो याची माहिती दिली.
महेश लांडगे यांनी भाषणात भारत देश सुरक्षित राहून विकसित करण्यासाठी शिरूर लोकसभेचा उमेदवार कोणीही असो मत मोदींना म्हणजेच लोकसभेतील सदस्य मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्याला करावे असे आवाहन केले.
यावेळी राजेश पांडे यांचे भाषण झाले.शिरूर लोकसभेतील सर्व पदाधिकारी,मंडल अध्यक्ष,सुपर वॉरियर्स,शक्ती केंद्रप्रमुख,जिल्हा पदाधिकारी,प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते,महिला मोर्चा,युवा मोर्चा, विविध आघाड्या,बूथ अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ,डॉ ताराचंद कराळे, भगवानराव शेळके यांनी आभार मानले.
