HRM college | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २ लाख ९३ हजारांच्या शिष्यवृत्तीचे वाटप 

शैक्षणिक  वर्ष २२-२३ मधील १२० विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख ९३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप

HRM college | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २ लाख ९३ हजारांच्या शिष्यवृत्तीचे वाटप 

 

राजगुरूनगर : लोकनेते शरदराव पवार यांच्या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बँक खात्यात ५० लाख रूपये ठेव स्वरूपात जमा करण्यात आले आहेत. या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून सावित्रीबाई फुले, शारदाबाई पवार, साहेबराव बुट्टेपाटील आणि दत्तात्रेय वळसेपाटील यांच्या नावाने संस्थेच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. 

 

शैक्षणिक  वर्ष २२-२३ मधील १२० विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख ९३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, सुशिल शिंगवी, हिरामण सातकर, बाळासाहेब लिंभोरे,  प्रमोद गाणू, राजेंद्र  टाकळकर, बळवंत डांगले, विजय वाडेकर,  प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, प्राचार्य डॉ. एच.एम.जरे, उपप्राचार्य डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक के.आर. पाचारणे आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 

 

या शिष्यवृत्ती धारकांमध्ये गुणवंत परंतु आई-वडील नसलेले,  मागास प्रवर्गातील, आदिवासी, आर्थिक दुर्बल तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार ९५ विद्यार्थिनी व  २५ विद्यार्थी असे एकूण १२० विद्यार्थ्यांना २ लाख ९३ हजार ९०० रूपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.   

 

या प्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल  लोकनेते शरदराव पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा विनियोग शैक्षणिक कारणासाठी करावा. तसेच विद्यार्थ्यांनी दातृत्वाची भावना आपापल्या आयुष्यात कायम ठेवावी व भविष्यात या सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी केले.