तोरणे बु जि.प शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
राजगुरुनगर
तोरणे बु (ता.खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कीर्ती बेन मदत बेन,मदन भाई यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांची गरज ओळखून, स्वतः मुंबईवरून येऊन शालेय वस्तू वही,पेन, स्कूल बॅग,कॅम्पस इतर साहित्य वाटप केले.
यावेळी सरपंच आरती शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल राऊत, उपाध्यक्ष कृष्णा आवारी, माजी सरपंच किसन आवारी, माजी उपसरपंच बाळासाहेब,विलास महाराज शिंदे,अर्जुन देवाडे, माया वरकड,सचिन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक बाबाजी गायकवाड यांनी तर आभार केंद्रप्रमुख संजय गोपाळे मानले.
