Junnar | शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचे शिवसेनेतून निलंबन
शरद सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे
Sharad Sonvane
महावार्ता लाईव्ह | शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांना शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून सोनवणे यांना निलंबित करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी कळविले आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे पत्र प्रसिद्धीस देण्यात आले आहे. माजी आमदार शरद सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
