Diwali special | शेतमजुरी करणाऱ्या ठाकर बांधवांनी दिवाळी साजरी करावी म्हणून हा उपक्रम : शरद बुट्टे पाटील

२३ वर्षांपासून शरद बुट्टे पाटील व मित्र परिवाराकडून खेड तालुक्यातील आदिवासी ठाकरवाडी आणि कातकरी वस्तीमध्ये दिवाळीचा उपक्रम राबवला जातो

Diwali special | शेतमजुरी करणाऱ्या ठाकर बांधवांनी दिवाळी साजरी करावी म्हणून हा उपक्रम : शरद बुट्टे पाटील

 

राजगुरूनगर | भाजपचे  जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आदिवासी ठाकर समाजाबरोबर दिवाळी साजरी केली.दिवाळीचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी मागील २३ वर्षांपासून शरद बुट्टे पाटील व मित्र परिवाराकडून खेड तालुक्यातील आदिवासी ठाकरवाडी आणि कातकरी वस्तीमध्ये दिवाळीचा उपक्रम राबवला जातो.यावर्षी  कोये, पाईट, तळवडे आणि कोहिंडे बुद्रुक या गावातील सात ठाकरवाडी मधील आदिवासी कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली.या कुटुंबांना रवा, मैदा, साखर तेल साबण आणि खोबरे तेल असे ७ किलो किराणाचे किट व दिवाळी फराळ वाटप केला. यावेळी तीनशेहून अधिक महिला व तरुण उपस्थित होते.

 

 

 


यावेळी शरद बुट्टे पाटील म्हणाले शेतमजुरी करणारा हा ठाकर समाज दिवाळी साजरी करू शकत नाही. या कुटुंबामध्ये दिवाळी साजरी व्हावी, म्हणून त्यांच्यासाठी दिवाळी फराळ आणि किराणा किट देत आहोत. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या आदिवासी ठाकरवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला आहेच. परंतु सामाजिक जीवनात देखील आपला समाज सर्वांच्या बरोबर असला पाहिजे यासाठी आपण विविध उपक्रम राबवत असल्याचे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले. यावेळी आदिवासी ठाकर समाजाचे प्रतिनिधी बाजीराव पारधी, बाळासाहेब भालेराव, नवनाथ दोरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

 

​​​​​​

 

यावेळी तळवडे गावच्या सरपंच वेणुताई बोंबले, कोहिंडे बुद्रुकच्या माजी सरपंच पूनाबाई पारधी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, तळवडेचे पदाधिकारी संतोष हगवणे, हनुमंत बोंबले, हौशीराम वाळुंज,उद्योजक मारुती कोळेकर,अहिरेचे उपसरपंच सबाजी कोयते, आंबेठांणचे माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर,रोहिदास मांडेकर यासह सुनील शिंदे, वैभव कोळेकर, अनिल कलवडे, सुधीर राळे, सागर राळे, आकाश राळे, विठ्ठल शिंदे, संतोष रौंधळ, शरद निखाडे, मिलिंद जाधव, नितीन वाघमारे, अमोल राऊत, संतोष काळे, भिमाजी कचाटे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.