खेड तालुक्यातील ग्रामपंचायत पाडळी-काळेचीवाडी येथे कायदेविषयक शिबिर संपन्न - अँड देविदास शिंदे
राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुका वकीलबार असोसिएशनचे वतीने खेड तालुक्यातील ग्रामपंचायत पाडळी-काळेचीवाडी येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाले.'आझादी का अमृत महोत्सव'कार्यक्रमानिमित्त या शिबिराचे आयोजन खेड तालुका वकिलबार असोसिएशनचे अध्यक्ष अँड देविदास शिंदे पाटील यांनी केले.
कायदेविषयक शिबिराचे उदघाटन असोसिएशनचे अध्यक्ष अँड देविदास शिंदे पाटील यांचे हस्ते फित कापून झाले.यावेळी पाडळी-काळेचीवाडी गावचे सरपंच सौ. वैशाली बाबाजी काळे,ग्रामपंचायत सदस्य सुदाम सातपुते, विकास सोसायटीचे चेअरमन संपत बालघरे,वकिलबार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड.गणेश गाडे पाटील,सचिव अँड.संदीप गाडे, खजिनदार अँड. माणिक वायाळ, कार्यकारिणी सदस्य अँड.स्नेहल पवळे,असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड.रामदास घोलप,अँड.वंदना तळेकर, अँड.सविता काळे,अँड.संकेत सांडभोर,अँड.पठाण, सरसेनापती हंबीरराव विधी कॉलेजचे प्रा.चव्हाण मॅडम व कॉलेजचे विद्यार्थी हजर होते.
शिबिरात अनेकांनी कायदेविषयक माहिती उपस्थित नागरिकांना दिली.ग्रामपंचायतीचे वतीने असोसिएशनचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
------------------------------------------------------------------------------
