Shirur loksabha | महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांना भराडी येथून मताधिक्य देण्याचा संकल्प
विद्यमान खासदार हे कुठे असतात माहित नाही. शिरूर लोकसभेच्या ६ विधानसभा मतदार संघात निष्क्रिय म्हणून त्यांची ओळख ; विष्णू काका हिंगे यांची खा.अमोल कोल्हे यांच्यावर टीका

मंचर | आंबेगाव तालुक्यातील गाव भेटी दौऱ्यानिमित्तने शिरूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी भराडी येथील श्री भराडी माऊली मंदिरात दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरात आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विष्णू काका हिंगे म्हणाले, "शिवाजी आढळराव पाटील आपला माणूस आहे. आपल्यासाठी नेहमी तयार असणारा माणूस आहे. दर रविवारी त्यांचा जनता दरबार सुरू असतो. दादा आपल्या समस्या सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असतात. तर दुसरीकडे सध्याचे विद्यमान खासदार हे कुठे असतात माहित नाही. सगळ्या लोकसभेच्या ६ विधानसभा मतदार संघात निष्क्रिय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत निर्धार करा आणि दादांना साथ द्या"
उद्योजक देवेंद्र शहा म्हणाले की, "जो आपल्या हाकेच्या अंतरावर उपलब्ध असतो असा प्रतिनिधी आपण निवडला पाहिजे. आंबेगाव लहान जरी असला तरी जास्तीत जास्त मताधिक्य आढळराव दादा पाटील यांना इथून गेलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात."
युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, "आपला प्रतिनिधी कसा असावा जो आपल्यासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध असेल. आपण ज्याच्याकडे हक्काने काही गोष्टी मागू शकतो, असा लोकप्रतिनिधी असावा. दादा असेच आहेत. त्यांना आपल्याला निवडून आणायचे आहे. त्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत.आढळराव पाटील यांच्याशी तुम्ही सर्व परिचित आहात कठीण काळ कसा हाताळावा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे.''
माजी सरपंच गोविंद खिल्लारे आपले मनोगत मांडताना म्हणाले, मागच्या पंचवार्षिकमध्ये झालेली चूक परत होणार नाही, याची दक्षता घ्या. यावेळी योग्य उमेदवार म्हणजेच आढळराव दादा पाटील यांनाच निवडून देऊया. आंबेगाव तालुक्यातून भरपूर असे मत देऊन आम्ही दादांना नक्कीच दिल्लीत पाठवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी शरद सहकारी बँक अध्यक्ष देवेंद्र शहा, भिमाशंकर सहकारी कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पुर्वा दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद पुणे देविदास दरेकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंबेगाव विष्णू काका हिंगे, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष संजय थोरात, राकाँपा अध्यक्षा सुषमाताई शिंदे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, पुणे जिल्हा राकाँपा महिला उपाध्यक्ष रूपाली भोजने, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, नेते सुनिल बाणखेले, उद्योजक जेडी डेमगिरे, उद्योजक संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्था संचालक महेश ढमढेरे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव कार्याध्यक्ष निलेश थोरात, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात, युवासेना राष्ट्रिय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, अवसरी युवानेते अजित चव्हाण, शिरुर लोकसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सचिनभाऊ भोर, माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघ आंबेगाव रमेश खिल्लारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मनोहर अरगडे, सरपंच छायाताई गाडेकर, अध्यक्ष तंटामुक्ती नवनाथ गावडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गावडे, माजी चेअरमन भाऊसाहेब गावडे, माजी चेअरमन सोसायटी धनंजय खिल्लारी, रमेश खिल्लारी, बाबासाहेब खिल्लारी, दत्तात्रय जांभळे, नवनाथ गावडे, नारायण पंडित, नितीन आरगडे, अजय खिल्लारी, कैलास खिल्लारी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.